नवीन लेखन...

शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार

औरंगाबादमधील शिवसेनेचे आमदार आणि राज्याचे महसूल, ग्रामविकास राज्यमंत्री यांचा जन्म १ जानेवारीला झाला.

सिल्लोड शहरातील अत्यंत गरीब कुटुंबातून पुढे आलेल्या अब्दुल सत्तार यांनी मोलमजुरी, हमाली करून शिक्षण पूर्ण केले. याच दरम्यान छोटासा सायकल दुकान व्यवसाय सुरू केला. 1984 साली सिल्लोड ग्रामपंचायतची निवडणूक लढवून जिंकली.

माजी मंत्री बाबूरावजी काळे, सहकार महर्षी बाळासाहेब पवार, शिक्षण व सहकार महर्षी माणिकरावजी पालोदकर यांच्यासोबत राजकारणामध्ये काम करण्याची व राजकारण शिकण्याची त्यांना संधी मिळाली. १९९४ साली सिल्लोड नगरपरिषदेची पहिली निवडणूक झाली. सिल्लोड नगरपरिषदेचे पहिले नगराध्यक्ष झाले. नगरपरिषदेच्या वीस वर्षाच्या सत्ता कार्यकाळात अडीच-तीन वर्षे सोडता पूर्ण कार्यकाळ अब्दुल सत्तार दांपत्यांनी नगराध्यक्ष म्हणून भूषविले आहे व आजही सत्ता त्यांच्याकडे असून नगराध्यक्षपदी त्यांच्या पत्नी नफिसाबेगम अब्दुल सत्तार असून नगरपरिषदेच्या एकूण एकोणतीस सदस्यांपैकी अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली पंचवीस नगरसेवक सभागृहात आहेत. विविध शिक्षण संस्था, जिल्हा मध्यवर्ती सहकार बॅंक, हज कमिटी, रोजगार हमी योजना, पंचायत राज आदि शासकीय समित्यांसह विविध समित्यांवर काम करताना भागातील शेतकरी, शेतमजूर व व्यापाऱ्यांची मदत करण्याचे काम केले. शंकररावजी चव्हाण यांनी अब्दुल सत्तार यांना कॉंग्रेस पक्षात नुसता प्रवेश दिला नाही तर २००१ मध्ये स्थानिक स्वराज्य संथा मतदार संघातून विधानपरिषदेची उमेदवारी मिळवून दिली. विरोधकांवर मात करत ते विधानपरिषद सदस्य झाले. कॉंग्रेस पक्षाने अब्दुल सत्तार यांच्या कामाची पद्धत पाहून २००४ साली सिल्लोड विधानसभा मतदार संघातून उमेदवारी दिली मात्र स्व:ताच्या पक्षातील अनेकजण विरोधात उभे राहिले व पक्षातील अनेकांनी विरोधी पक्षाच्या उमेदवाराला मदत केल्याने अब्दुल सत्तार यांचा निसटता पराभव झाला.

२००७ मध्ये विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने अपक्ष उमेदवार मैदानात उतरवून अब्दुल सत्तार यांना शह देण्याचे कामे केले. २००९ साली त्यांना पक्षाने सिल्लोड विधानसभा मतदार संघातून उमेदवारी दिली. याच दरम्यान एकाकाळाचे त्यांचे राजकीय नेतृत्व असलेले परंतु काही कारणास्तव १९९६ ते २००८ पर्यंत दूर गेलेले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रभाकरराव पालोदकर यांच्या सोबत त्यांचे राजकीय सूत जुळले व त्यांच्या मदतीने अब्दुल सत्तार यांनी विधानसभेची निवडणूक मोठ्या फरकाने जवळपास तीस हजार मताधिक्या्ने जिंकली. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांना कॅबिनेट मंत्री पद देऊन पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्य व्यवसायाचे खाते दिले. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीतही भाजपचे सुरेश बनकर यांचा पराभव करून ते १५ हजार मतांनी निवडून आले.

२०१९ मध्ये शिवसेनेत प्रवेश करत त्यांनी धनुष्यबाणाचा प्रचार करून आमदारकी मिळवली आणि मंत्रिपदही.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..