नवीन लेखन...

शिवरायांचे “८” वावे रूप

रसिक वाचकहो , सप्रेम नमस्कार !

या लेखाचं शिर्षक वाचून तुम्हाला थोडेसे आश्चर्य वाटले असेल्.काहींच्या मनात असंही आलं असेल की आजच्या या संगणक युगात ई-मेल मधे लिहितात तसंच हे पण काही शॉर्ट कट वगैरे आहे की काय?

पण माझ्यासारख्या तमाम शिवभक्तांना मी अत्यंत विनम्रपणे हे सांगू इच्छितो की “या शिर्षकात वापरलेला”८” ह्या आकड्याला शिवरायांच्या कारकिर्दीत अनन्यसाधारण महत्व आहे” हे कळावे म्हणूनच हा एव्हढा ऊहापोह ! मी स्वतः एक अभियंता असल्यामुळे कदाचित मला हे “अंकशास्त्र” भावले आहे आणि लेख वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल की हा निव्वळ योगायोग नव्हे !

लेख सुरु करण्यापूर्वी “गुणांक” म्हणजे काय हे समजावून घेवूया कारण या लेखात हा शब्द फार वेळा येणार आहे.

समजा एखाद्या माणसाचा जन्मदिनांक २१-मार्च-१९८५ आहे तर त्याच्या जन्मतारखेचा गुणांक काढण्यासाठी आपण सगळ्या आकड्यांची “एक” अंकी उत्तर येईपर्यंत बेरीज करायची – जसे यात २१-०३-१९८५=२+१+३+१+९+८+५=२९=२+९=११=१+१ =२, म्हणजे गुणांक “२”

तर आता आपण मूळ लेखाकडे वळुया. या लेखाचे “८” महत्वाचे “योगायोग” आहेत ते क्रमशः असे :

१. शिवरायांना “८” बायका होत्या :
१. सईबाई निंबाळकर
२. सगुणाबाई शिर्के
३. सोयराबाई मोहिते
४. लक्ष्मीबाई विचारे
५. सकवारबाई गायकवाड
६. काशीबाई जाधव
७. पुतळाबाई मोहिते
८. गुणवंताबाई इंगळे

२. शिवरायांना “८” अपत्ये होती ती पुढीलप्रमाणे :

माता अपत्याचे नांव अपत्याच्या नवरा / बायको चे नांव
सईबाई १. सखुबाई ऊर्फ सकवारबाई – महादजी निंबाळकर
२. राणुबाई ऊर्फ राणूअक्का जाधव
३. अंबिकाबाई हरजीराजे महाडिक
४. संभाजी येसुबाई, दुर्गाबाई, चंपाबाई (कछवाह घराणे)
सोयराबाई ५. दीपाबाई विसाजीराव
६. राजाराम जानकीबाई,ताराबाई,राजसबाई,अंबिकाबाई
सगुणाबाई ७. नानीबाई ऊर्फ राजकुंवर गणोजी शिर्के
सकवारबाई ८. कमलाबाई जानोजी पालकर (नेताजी पालकरांचा मुलगा)

३. शिवरायांची उंची होती ५’ ८” = १७० सेंटीमीटर=१+७=८ गुणांक “८”

४. शिवरायांचा जन्म : १९-०२-१६३०=१+९+२+१+६+३ =४ जन्म गुणांक= ४
शिवरायाचा म्रुत्यु : ०३-०४-१६८०=३+४+१+६+८=४ म्रुत्यु गुणांक=४
आयुष्याचा गुणांक्=जन्म गुणांक्+म्रुत्यु गुणांक= ४+४ = “८”

५. शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली रोहिडेश्वरी : १५-०४-१६४५, गुणांक “८”

६. कल्याण्-भिवंडी काबीज केली : २४-१०-१६५७ , गुणांक “८”

७. सईबाईंचा म्रुत्यु : ०५-०९-१६५९ , गुणांक “८”

८. शिवरायांचा राज्याभिषेक झाला (१६७४ साल) तेंव्हा त्यांचे वय होते ४४ पूर्ण = ४+४= गुणांक “८”
शिवरायांचे वजन होते १६,००० होन= ४ मण
शिवरायांच्या सिंहासनाचे वजन होते ३२ मण , म्हणजेच शिवराय स्वतःपेक्षा त्या पवित्र सिंहासनाला ३२ /
४= “८” पटीने मान द्यायचे
राज्याभिषेकानंतर शिवरायांनी मंत्रीमंडळाची स्थापना केली : “अष्ट” प्रधान मंडळ , मंत्री “८”

म्हणूनच तर समर्थ रामदास स्वामींनी म्हटले नसेल ना?

शिवरायांचे “८” वावे रुप
शिवरायांचा “८” वा प्रताप
शिवरायांचा “८” वावा साक्षेप
भू मंडळी !

आम्ही पण “८”वतो शिवरायांना “अष्टौ”प्रहर म्हणजे “८” प्रहर !

हा लेख मी लिहिला (बरेच दिवस मनात असूनही काल लिहिला) २६ तारखेला – गुणांक “८” , साल – एकविसाव्या शतकातील “८” वे , लेख पूर्ण केल्याची वेळ रात्री १० व. ३१ मि. म्हणजेच इंग्रजी वेळेप्रमाणे तासांच्या हिशोबात २२.३१ अवर्स = २+२+३+१= गुणांक “८”

अश्या या आमच्या आराध्य दैवताची कीर्ती दिगदिगंत “अष्ट्”दिशांना पसरत राहो ह्या सदिच्छेसह,

उदय गंगाधर सप्रे
ठाणे

Sudayan2003@yahoo.com 

WhatsApp वरील `संगीत, संगीत फक्त संगीत’  या ग्रुपवरुन 

Avatar
About Guest Author 524 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..