कर्नाटकातील सिद्धगंगा मठाचे मठाधीश शिवकुमार स्वामी यांचा जन्म १ एप्रिल १९०७ रोजी रामनगर येथील वीरपूरा येथे झाला.
कर्नाटकाच्या राजकारणावर सिद्धगंगा मठाचा मोठा प्रभाव आहे. शिवकुमार स्वामी लिंगायत समुदायाच्या सिद्धगंगा या मुख्य मठाचे प्रमुख होते. हा मठ बंगळुरूपासून ८० किमीवरील तुमकुरुमध्ये आहे. कर्नाटकात त्यांच्या मठांची संख्या ४०० पेक्षा जास्त आहे. धार्मिक तसेच सामाजिक क्षेत्रात त्यांचे कार्य मोठे होते. १९६५ मध्ये कर्नाटक विद्यापीठाने त्यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली होती. त्यांना २००७ मध्ये कर्नाटक रत्न पुरस्काराने तर २०१५ मध्ये पदमभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले होते. सिद्धगंगा मठाची सिद्धगंगा एज्युकेशन सोसायटी ही शिक्षण संस्था कर्नाटकात सुमारे १२५ शैक्षणिक संस्था चालविते. कर्नाटकातील राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज व्यक्ती शिवकुमार स्वामींचे भक्त आहेत. याआधी भाजपचे अध्यक्ष अमित शहा, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी स्वामींचे दर्शन घेऊन त्यांचे आशिर्वाद घेतले आहेत.
कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी नुकतीच स्वामींना भारतरत्न देण्याची शिफारस केली होती. लिंगायत समाजाचा हा मठ ३०० वर्षांपूर्वीचा आहे. मठात १० हजारांहून जास्त मुलांना भोजन, शिक्षण आणि राहण्यासाठी घर अशा सुविधा मोफत दिल्या जातात. याशिवाय गरिबांसाठी रुग्णालये आणि मोफत निवास व्यवस्था पुरवली जाते.
शिवकुमार स्वामी यांचे २१ जानेवारी २०१८ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply