एकजण ओळखीचा आहे तो मस्करीत म्हणतो
सकाळ झाली , सगळे आटोपले की आरशात बघून दोन सणसणीत शिव्या घालतो.
मग एकदम फ्रेश….?
मला माहित आहे तो हे फेकत असणार.
त्याचे हे बोलणे ऐकून मला विचार करण्यास भाग पाडले.
शिव्यांचे , अपशब्दंचे आपल्या आयुष्यात स्थान काय ? असा प्रश्न मला पडला , तुम्हालाही पडला असेलही. अर्थात १०० टक्के सज्जन माणसे सोडून म्हणतोय मी ?
नीट पाहिले तर आपल्या कोकणापासून सर्वच ठिकाणी खास शिव्या आहेत, म्हणी आहेत.
मी जेव्हा आमच्या मराठे सरांचे’ असभ्य वाकप्रचार आणि म्हणी हे पुस्तक ‘ वाचल्यावर खूप काही लक्षात येते.
प्रत्येक भाषेत शिव्या आहेत, नुसत्या मराठी भाषेत नाहीत. मराठी मध्ये आयला न म्हटलेला
माणूस नसेल. अर्थात आयला ही शिवी होती का बोली शब्द होता हा संशोधनाचा विषय असेल पण हा शब्द कॉमन केले तो आपल्या दादा कोडके यांनी.
काही माणसांच्या तोडी सतत शिव्या असतात, सरळसोट बोलणे असते अशी माणसे अगदी सहसा लपवा छपवी करत नाहीत. आहे ते तोंडावर अगदी पुल देशपांडे यांच्या रावसाहेब प्रमाणे.
शिव्या दिल्याने मनातील स्ट्रेस जातो, मन निर्मळ वगैरे होते असे म्हंटले जाते. दिल्लीत राहत होतो तेव्हा मराठी शिव्या ऐकण्यास मिळत नव्हत्या . परंतु एक दिवशी मी दिल्लीमधील ज्या भागात रहात होतो त्या मध्यवर्ती भागात म्हणजे बाजूच्याच बिल्डिंग मध्ये जबरदस्त भांडण झाले ते भांडण बायकांच्या मध्ये झाले. परंतु त्या त्यांच्या भाषेतून शिव्या पण देत होत्या. खरेच कान तृप्त झाले नवीन शिव्यांची ज्ञानात भर पडली.
जरा वेगळाच भाषेचा लहेजा कानावर पडला. आता मुंबईत आहे. आपली मराठी भाषा नाही तर सर्वच भाषा सगळ्याच बाबतीत समृध्द आहेत. इग्रजी भाषा जरा त्याबाबतीत कमीच आहे.
माझा एक फेमस मित्र आहे मी त्याला जेव्हा फोन करतो तेव्हा माझ्या बोलण्यात सरासरी दोन मिनिटांनी शिवी असतेच. कारण पुल छा रावसाहेब माझ्यात पक्का मुरलेला आहे.
त्याच्याशी बोलताना कधीही शिवी देणारा तो त्याच्या तोडून च्यायला शब्द बाहेर पडला तेव्हा त्याच्या घरात त्यांची नेहमीची कामवाली बाई कर काढत होती. त्याच्या तोडून च्यायला शब्द बाहेर पडल्यावर ती भांबावली. तेव्हा मित्राची बायको म्हणाली त्यांच्या मित्राशी बोलत आहेत.
मला पण आनंद झाला आपण त्याच्या तोडून शिवी बाहेर काढली म्हणून. अर्थात मनात देत असणार बहुतेक, असो. शिव्या देण्याने, खाण्याने मन मोकळे होते म्हणतात , काही स्ट्रेस रहात नाही.
पण त्या शिव्या निर्विष असणे आवश्यक, त्यात एक सहजता हवी की कुणालाही राग येत काम नये इतक्या निर्मळ आणि ‘ सात्विक ‘ हव्यात ?
बरोबर ना….
तुमचे काय मत आहे …
-सतीश चाफेकर
Leave a Reply