अत्यंत रोमहर्षक, उत्कंठावर्धक कादंबरी…
उत्कंठावर्धक कादंबरी लिहिण्यासाठी खजिन्याचा शोध हा रुळलेला प्रकार बघावयास मिळतो. हॉलिवुड पटांमधली निकोलस केजची नॅशनल ट्रेजर सिरीज किंवा हैरिसन फोर्डची इंडियाना जोन्स सिरीज अश्याच पठडितल्या कथांची उदाहरणे…
अशीच एक उत्कंठा लावणारी कथा ती पण मराठी मध्ये नाशिकच्या मुरलीधर खैरणार यांनी लिहिली आहे.
शोध…राजहंस प्रकाशन..
या कादंबरीचे मुखपृष्ठच इतके सरस आहे की कादंबरीचे नाव आणि मुखपृष्ठ बघुन वाचकाने ते हाताळले नाही तर नवलच…
हि कथा आहे छत्रपतींच्या काळातील आणि आजच्या काळातील..
महाराजांनी सुरतेवर अनुक्रमे १६६४ आणि १६७० अश्या दोन वेळा लूट केली. पैकी पहिली लूट जशीच्या तशी स्वराज्यात आली पण दूसरी लूट आलीच नाही..दुसऱ्या लुटीनंतर माघारी येत असताना गनिमांना हूल देत महाराज खजिन्याचा एक भाग घेऊन स्वराज्यात पोहचले पण दुसरा भाग घेऊन येत असलेले गोंदाजी पोहचलेच नाही. गोंदाजींकडे तब्बल ११०० टन वजनाचा खजिना होता त्याची आजची किंमत २५ लाख कोटी रुपये इतकी..त्यावेळी गोंदाजीच्या मागे गनीम लागले आणि गोंदाजीने ठरलेला रस्ता बदलून खजिना कोठेतरी दडवून ठेवला.
कुठे ठेवला हा खजिना..?
बस्स… याच तुम्हाआम्हाला पडलेला प्रश्न केतकीला देखील पडतो..या खजिन्याचा माग तरी कसा काढायचा हा एकच प्रश्न तीला सतावतो…केतकी…गेली तीन शतके तिच्या पिढ्या या खजीन्याच्या शोधात आहे.
काही करुन हा खजिना तिला मिळवायचा असतो… का?
त्याचप्रमाणे इतिहास संशोधक शौनक आणि काका.. यांना देखील खजिना शोधयचा असतो यासाठी ते फेसबुक चा इष्टतम वापर करतात.
एकीकडे हे तिघे….
आणि दुसरीकडे अजित आणि आबाजी… पैकी अजित देशातील एका मोठ्या कंपनीचा मालक.. तो ही या खजिन्यामागे…आणि विशेष म्हणजे देशातील सर्व सुप्रीमो शक्ती या खजिन्यासाठी वापरतो.
सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांमध्ये काय दडलंय. खास करून सप्तशृंगी, धोडप, अहिवंत, रावळ्या- जावळ्या इ. किल्ल्यांची माहिती संशोधन करून लेखकाने लिहिली आहे.यामध्ये येणारी ठिकाणे आपल्याच म्हणजे नाशिकच्या आजुबाजूची आहे. त्यामुळे पुस्तक वाचताना समजते की आपल्या आजुबाजूच्या वास्तुंना एवढा मोठा इतिहास आहे.तसेच कळवण आणि त्याच्या आजुबाजुचा परिसर, तिथे होणारे आदिवासी लोकांचे सण, उत्सव…भाया, माऊली, डोंगरादेव, देवखळा यांचे वर्णन लेखनाने खुबिने केलेले आहे.
जवळपास ७५% पुस्तक वाचून होत तरी देखील या कथेचा नायक समजत नाही. प्रचंड उत्सुकता आणि वाचकाला खिळवून ठेवण्याची जबरदस्त क्षमता असलेले हे एक पुस्तक आहे..
ट्रेकिंग, खजिना शोधण्यासाठी वापरण्यात येणारे सिकोरस्की जातीचे हेलीकॉप्टर व् मेल डिटेक्टर ड्रोन…यांचा वापर लेखकाने केलेला आहे. त्याचबरोबर लेखक फेसबुक सारख्या सोशल मीडियाचा वापर करतात. आपण आपली सर्व वैयक्तिक माहिती फेसबुक सारख्या मिडिया वर पेरल्याने आपण खरच सुरक्षित आहोत का? हा प्रश्न देखील पडतो.
या कादंबरीचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे अगदी सोप्या शब्दात साडे तीनशे वर्षपूर्वीची गोष्ट लेखकाने प्रकाशात आणलेली आहे. नुसतीच् प्रकाशात न आणता त्या गोष्टीचा शोध लावला आहे. अर्थात हा शोध वाचकांच्या दृष्टिकोणावर अवलंबून आहे.
कादंबरीने अनेक जुनाट विचार पुसून काढले..उदा. नाशिकचे तेव्हाचे कलेक्टर जॅक्सन यंबद्दल खरी माहिती या मध्ये सापड़ते. ते कलेच्या बाबतीत किती दर्दी होते. इतिहास जतन करण्यात त्यांचा किती मोठा हात आहे. तेव्हाच्या लेखकांनी त्या परिस्थितीमुळे त्यांच्याबद्दल असे लिहिले…अर्थात तेव्हा आपले प्रथम उद्दिष्ट हे स्वतंत्र मिळविने हेच होते.त्याचप्रमाणे आदिवासींचे सण उत्सव यांची माहिती खजिना शोधताना वाचकाला अडकवून ठेवते..
केतकी आणि शौनक ही जोड़ी खजिन्यापर्यन्त पोहचते का?
आबाजी अजित कोणकोणत्या रणनिति आखतात..अखेरीस खजिना कोणाला सापड़तो…?
या कादंबरीचा नायक कोण? याचे उत्तर पुस्तक एकाग्रतेने वाचल्यावर ते ही अगदी शेवटी समजते…
शौनक असेल..नाही केतकी…केतकी तर तिच्या पूर्वजांसाठी काम करत होती…आबाजी असावे पण आबाजी तर अजितच्या सांगण्यावरुण काम करत होते…नाही मग इतिहास संशोधक काका असावे….जॅक्सनच्या खाजगी व्यक्तीसंदर्भात इतिहासप्रेमी काकांकडे शौनक आणि केतकी गेले असता केतकीला समजू न देता शौनक काकांसाठी एका कागदावर काहीतरी लिहितो..ते का? आणि असे काय लिहितो…आणि काकांची भूमिका अगदी शेवटी लक्षात येते ती कशी….???
नक्की वाचा
नाव -: शोध
लेखक -: मुरलीधर खैरनार
प्रकाशक -: राजहंस प्रकाशन
शोध कादंबरी वाचन करायचे आहे.