अनुभव आणि अनुभूती हे शब्द आपण नेहमी ऐकतो अर्थात अनुभूती म्हटले की त्याला अध्यात्मिक टच वगैरे आहे असे मी स्वतः कधीच समजत नाही अर्थात प्रत्येक अनुभव हा अनुभूती देतोच असे नाही कारण अनुभवाची अनुभूती होणे हहे व्यक्तीसापेक्ष आहे. आपण सतत अनेक गोष्टी बघत असतो त्याचा परिणाम आपल्यावर होतोच असा नाही. अनेक जण नॉन व्हेज खातात , एखादा प्राणी समजा कोंबडी त्याच्यासाठी कापताना तो तिच्याकडे अन्न म्हणून बघतो परंतु नॉन व्हेज न खाणारा त्याच्याबरोबर आला तर तो इतका निर्विकार कदाचित रहात असेल परंतु त्याचे लक्ष त्या कापल्या जाणाऱ्या फडफडीकडे किंवा त्या कापल्या जाणाऱ्या कोंबडीच्या डोळ्याकडे जाते आणि त्याच्या मनात अनेक प्रकरच्या विचारांचे काहूर उठते. घटना एक आणि अनुभव एक परंतु अनुभूती मात्र वेगळी. अर्थात हे वेगळे टोक आहे . मुद्दाम अनुभूती या शब्दाला अध्यात्मिक टच दिला नाही कारण ह्या घटना , अशा घटना मिनिटा मिनिटाला घडतच असतात. त्या आपल्या लक्षात येत नाहीत हे महत्वाचे.
तसेच प्रेमाचे आहे प्रत्येकाच्या प्रेम करण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत , व्यक्त करण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत. प्रेमाची अनुभूती होणे अत्यंत महत्वाचे आहे काहीजण व्यक्त करतात , तर काही आयुष्यभर अव्यक्तच रहातात. आमच्या कॉलेजमध्ये म्हणजे सुमारे ३० ते ३५ वर्षांपूर्वी माझ्या एक मित्राला एक मुलगी खूप आवडली होती अत्यंत साधी म्हणून. कारण तो जमाना ‘ रजनीगंधा ‘ टाईप चित्रपटांचा होता. त्यामुळे साधेपणा असलेल्या मुलींना विशेष डिमांड होती. त्याचे लग्नच काय परंतु एकमेकांशी कधी बोलले नाहीत. शेवटचे वर्ष झाले आणि फाटाफूट झाली अजूनही त्याला तिचे दर्शन नाही. आता त्याला मुले आहेत पण त्याच्या डोक्यात मात्र तीच आहे. विचार केला तर हसू येते आणि वाईटही वाटते. त्यामानाने हल्लीची मुले खूप सुखी आहेत , त्यांची प्रेमाची बॅलन्स शीट एकदम परफेक्ट, सस्पेन्स अकाउंटच नाही. हल्ली मुले-मुली जसे फिरतात , एन्जॉय करतात ते खूप महत्वाचे आहे कारण त्यांना कुठेतरी लटकत बसावेत लागत नाही आणि हळूहळू ही मंडळी आपले मार्ग आपणच शोधून काढतात. त्यात ते सुखी वगैरे असतात का असा प्रश्न विचारू नये कारण ‘ सुख ‘ या शब्दाची कोणी व्याख्याच कोणी करू शकणार नाही. अनुभवातून हल्लीची पिढी घडत आहे हे फार महत्वाचे आहे काहीजण म्हणतात बेताल वगैरे आहे , अजिबात नाही कारण १०० पैकी एखादाच सूड घेणारा निघतो म्हणून ९९ जण चुकीचे आहेत असे अजिबात नाही. तर काही वेळा प्रेम हे मुलगा किती श्रीमंत आहे ह्यावर बघून केलं जाते. आज मोठमोठया श्रीमंत टायकून म्हणणाऱ्यांची लग्ने किंवा प्रेम त्याची समाजातील सांपत्तिक स्थिती बघून केली जातात त्यात चित्रपट कलाकार खेळाडूंची मुले मुली ह्यांच्याकडे बघितलं पाहिजे . प्रसिद्धी आणि संपत्ती ह्यांची स्थिती सतत सारखी रहात नाही. मग त्यांचे जगणे कसे असेल. गम्मत आणि कुतूहलाचा विषय आहे तसाच एंडलेस आहे , आपल्याला त्यांची लग्ने तुटल्यावरच कळते नाहीतर काहीजणांची लग्ने तशीच सो कॉल्ड पद्धतीने तशीच रहातात. तुम्ही कितीही मोठे बिझनेसमन असा , तुमच्या लग्नाचा कितीही मोठा बोलबाला झालेला असो परंतु जेव्हा प्रेम नावाची गोष्ट येते तेव्हा समाधान फार महत्वाचे असते. ही मोडतोड हाय क्लास लोकांची असते परंतु सामान्य माणसे मुले , माणसे यांचे प्रेम देखील महत्वाचे असते.
आज बाहेर येताजाता मुले मुली मैत्रीने एकमेकांशी ओळख करून घेतात , प्रसंगी एकत्र रहातात, वावरतात . बागेमध्ये त्यांचे प्रेम फुलत असते तगर कधी तळ्याच्या काठावर . अर्थात हे सर्व बघणाऱ्यांमध्ये अनेक वेळा काय हे चालले आहे असा प्रश्न असतो . प्रसंगी पोलिसही हस्तक्षेप घेतात अर्थात हे सर्व होतच रहाणार आणि माझ्यामध्ये तसे होत रहाणे आवश्यक असते. अर्थात यात अनेक संस्कृतीरक्षक वादही निर्माण करतील परंतु एखादी गोष्ट एकमेकांना अपाय करत नसेल तर काय हरकत आहे असल्या गोष्टींमुळे २०२२ मध्ये समाज , तरुण पिढी अजिबात बिघडत नाही. अहो मोबाइलचे एक बटन दाबून सर्च केले की सर्वकाही मिळते. तेथे त्याचा हे बघून बिघडण्याचा प्रश्नच नाही . प्रेम हे नेहमीच सुंदर असते , त्याच्याकडे वेगळ्या नजरेने बघण्याची आता नितांत गरज आहे ते वाटते.
प्रेम हा अनुभव आहे आणि अनुभूती म्हणजे तुमचे उत्तम पद्धतीने जगणे ! हेच महत्वाचे असते. खिशात कडकी असली तरी सर्व काही सावरून घेतले जाते. खऱ्या प्रेमात पगाराच्या पॅकेजला किती महत्व द्यायचे ते आपणच ठरवले पाहिजे.
किंवा पॅकेज पाहून प्रेम करणे ज्याला लखलाभ होत असेल तर होवो परंतु जेव्हा खरे प्रेम एकमेकात असते तेव्हा सर्व गोष्ट नगण्य ठरतात , नाही तर फक्त व्यवहार उरतो तेव्हा मात्र परिस्थिती घातक होते आणि तेथे अनुभूती नसते तर एक वेगळ्याच विकृतीचा जन्म होतो . ह्यामध्ये माणूस प्रेम शोधण्याचा प्रयत्न करत असेल तर ती चूकच आहे आणि ती चूक न करणे महत्वाचे आहे. प्रेम हा अनुभव आहे आणि अनुभूती म्हणजे तुमचे मानसिक समाधान , मग लग्न करो किंवा न करो. आनंदाने एकत्र आनंदाने रहाणे महत्वाचे असते. एकमेकांबरोबर जगणे महत्वाचे . मग मनात विचार येतो मग लग्न ही अडगळ आहे का किंवा आपण एकमेकांकडून नको त्या अपेक्षा बाळगतो म्हणून ती अडगळ वाटते का ?
–सतीश चाफेकर
Leave a Reply