नवीन लेखन...

इमारतींमध्ये खांब असावेत का?

एका देवळात हरदासबुवांचे संध्याकाळी सहा वाजताचे कीर्तन ऐकायला लोक पाच वाजल्यापासूनच येऊन बसत. हरदासबुवांना वाटले त्यांचे कीर्तन फारच श्रवणीय असल्याने लोक अगोदरपासून येऊन बसतात. थोडी चौकशी केल्यावर समजले की देवळात असलेल्या खांबाना टेकून बसता यावे म्हणून लोक अगोदरपासून येऊन बसतात. त्यावरून कोणीतरी | विचारले की बिनखांबांचे अथवा खांबच खांब असलेले बांधकाम शक्य आहे का? इमारतीचे बांधकाम दोन पद्धतीने होते.

एक लोड बेअरींग आणि दुसरे आरसीसी. पहिल्या प्रकारात विटाच्या भितींचा वापर इमारतीला आधार देण्यासाठी केला जातो. त्यात काँक्रिटचे खांब, तुळया वगैरे नसतात. साधारणपणे ग्रामीण भागात आणि जुन्या इमारतींचे बांधकाम या प्रकारे केलेले आढळून येते. मात्र फार मोठी आणि उंच इमारत बांधणे या प्रकारे शक्य नसते. तसेच अशी इमारत एकदा बांधून झाली की त्यात बदल करता येत नाहीत. आरसीसी बांधकाम करताना प्रथम खांब आणि तुळया यांचा सांगाडा तयार करतात. मग त्यावर भिंती घालतात. या प्रकारात कितीही मोठी गगनचुंबी इमारत पण बांधता येते. खांब आणि तुळयांच्या रचनेत बदल न करता इमारतीच्या रचनेत बदल करता येतो.

गगनचुंबी इमारती मुळात खांब आणि तुळयांवरच उभ्या असतात. प्रत्येक इमारतीतील खांबांची संख्या वेगवेगळी असते. आकारही वेगवेगळे असतात. या खांबांची संख्या आणि आकार स्ट्रक्चरल इंजिनिअर ठरवतात. हे • ठरवताना त्या इमारतीचा वापर कशासाठी होणार आहे, ही गोष्ट मुख्यत्वे ध्यानात घेतली जाते. म्हणजे लोकांची ये-जा किती असणार. उदाहरणार्थ रुग्णालये, रेल्वे पूल किंवा निवासी इमारत. तसेच त्या इमारतीवर भिंतीसारख्या गोष्टींचे (डेड) वजन किती पडणार वगैरे मोजतात. या दोन्ही प्रकारचे वजन/भार, सहन करण्याची ताकद असावी असे खांब डिझाईन करावे लागतात. हे खांब इमारतीत वेगवेगळ्या ठिकाणी असतात. त्या इमारतींवर पडणारे अपेक्षित वजन/भार ध्यानात घेऊन त्यांचा आकार ठरवला जातो.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..