सुळीं दिले येशूला वेडेपणाच्या भरांत
खिळे ठोकले अंगाला रागाच्या ओघांत ।।१।।
समर्पण केले देहाचे परि न सोडी ध्येय
बलिदानाच्या मार्गाचे हेच महत्व होय ।।२।।
सुळावरी तो जातांना वदला आकाशी बघूनी
क्षमा कर प्रभू त्यांना ते आहेत अज्ञानी ।।३।।
कळले नाहीं ज्ञान अज्ञान सागरांत
जाणले तत्वज्ञान उशीर केला त्यांत ।।४।।
उपयोग नाही आतां वेळ गेली निघूनी
जाण मनां येता पक्षी गेला उडूनी ।।५।।
हरकत नाहीं कांहीं उशीर झाला तरी
तत्वामध्ये रस घेई हीच श्रद्धांजली खरी ।।६।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@gmail.com
Leave a Reply