बरसता श्रावणसरी,मन पाखरून जाई,
ओली ओली हिरवळ,मन हारकुन जाई.
आला श्रावण घेऊन,सखे घन काळेभोरं,
त्यांनी बरसुन गेले,देले सुखाचे आंधनं.
आंधनात तिलं आलं,नच पाणी ते जिवनं,
धरू घटाघटा पिई,मिटे व्याकुळ तहानं.
पशु-पक्षी,झाडं वेली,डौल डौलती डौलातं,
नक्षी शोभे फुलं वेलं,शोभे कोंदनं गोंदनं.
लेणं आहेव हिरवं,काळी करे हिरवा तालं
तिचा आहेव शृंगार,भाळी शोभे फुल लालं.
आहेव काळी धरूमायं,तिनं लेला हिरवा चुडा,
ओटी पाण्यानं भरली,फुटे काळी पोटी खडा.
खळखळ पाणी वाहे,वाहती नदी,नाले,पाटं
कोकीळ झाडावुनं गायी,राग निसर्गाचा थाटं.
वसुमायच्या सासरी,बरसले माहेरचे घनं,
अवघी श्रुष्टी महकली,आले आंनंदा उधानं.
वसु मायचा संसार,उनं पावसाचा कहर,
कधी रापतं भिजतं,ओढी नेटानं संसार..!!!
©गोडाती बबनराव काळे
9405807079
Leave a Reply