आदिक्षान्तसमस्तवर्णनकरी शम्भोस्त्रिभावाकरीकाश्मीरत्रिपुरेश्वरी त्रिलहरी नित्याङ्कुरा शर्वरी ।
कामाकाङ्क्षकरी जनोदयकरी काशीपुराधीश्वरी
भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी ॥७॥
आदिक्षान्त – हा येथील पहिला शब्दच मोठा रमणीय आहे. आदि शब्दातही अ+ आदि असा विग्रह आहे. त्याचा अर्थ पासून सुरु होणारे. क्षान्त अर्थात क्ष पर्यन्तचे. अ पासुन क्ष पर्यंतचया सर्व वर्णांपासून निर्माण होणारे सर्व शब्द जिचेच वर्णन करतात तीआदिक्षान्तसमस्तवर्णनकरी.
या मध्ये ज्ञ चा उल्लेख नाही. ज्ञ ज्ञानाचा वाचत आहे आणि ते ज्ञान तिचे स्वरूप आहे. अ पासून क्ष पर्यंतच्या सर्व वर्णांच्या द्वारे त्या ज्ञ अर्थात जगदंबेचेच वर्णन केले जाते ती आदिक्षान्तसमस्तवर्णनकरी.
शम्भोस्त्रिभावाकरी- भगवान शंकरांना तीन भावांमध्ये प्रगट करणारी. येथे भगवान शंकर हा शब्द परब्रह्म या अर्थाने आला आहे. त्या निरगुण निराकार परब्रह्माला सत्व,रज,तमात्मक तीन गुणांनी युक्त, सगुण साकार करणारी.
काश्मीरत्रिपुरेश्वरी- काश्मीर प्रांतात निवास करणारी त्रिपुरसुंदरी.
त्रिलहरी- तीन गुणांच्या रूपात हालचाल करणारी.
नित्याङ्कुरा- अंकुर हे नूतनतेचे, विकासनशीलतेचे प्रतीक. तशी नित्यनूतन असणारी. शर्वरी – शर्व म्हणजे भगवान शंकर. त्यांच्या विनाशकारी शक्ती मुळे त्यांना हे नाव आहे. त्यांची शक्ती म्हणून शर्वरी.
कामाकाङ्क्षकरी- भक्तांच्या कामना, आकांक्षा पूर्ण करणारी.
जनोदयकरी- साधकांच्या भाग्याचा उदय करणारी.
काशीपुराधीश्वरी- काशीनगरीची सम्राज्ञी.
भिक्षां देहि कृपावलंबनकरी मातान्नपूर्णेश्वरी- सकल कृपांचा आधार असणाऱ्या हे आई अन्नपूर्ण! मला भक्ती ज्ञान वैराग्यरूपी भिक्षा प्रदान कर.
— विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply