श्रीनाथादृतपालितत्रिभुवनां श्रीचक्रसंचारिणीं।दीनानामतिवेलभाग्यजननीं दिव्याम्बरालंकृतां
श्रीशैलस्थलवासिनीं भगवतीं श्रीमातरं भावये।।५।।
श्रीनाथादृत- श्री म्हणजे देवी लक्ष्मी.तिचे नाथ म्हणजे भगवान विष्णू. त्यांच्याद्वारे आदृत म्हणजे आदर व्यक्त केला आहे अशी.
पालितत्रिभुवनां- स्वर्ग, मृत्यु ,पाताळ अशा तीनही भुवनांची पालन कर्ती. श्रीचक्रसंचारिणीं- शाक्त उपासनेत श्री यंत्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे.त्या यंत्रात विद्यमान समस्त देवतांच्या ठिकाणी विद्यमान चैतन्यशक्ती.
यानंतरचे विशेषण शांतपणे समजून घ्यावे लागेल.
ज्ञानासक्त- ज्ञान मिळवण्याची इच्छा असलेल्या,
मनोज- कामदेव व त्यांच्या शक्ती,
यौवनलसद्- यौवनाने मुसमुसलेल्या.
गन्धर्वकन्यादृताम्- गंधर्वकन्यांनी आदर दिलेली.
गंधर्वकन्या या मदन गुणांनी आणि यौवनाने परिपूर्ण आहेत. मात्र त्यांना अपेक्षा ज्ञानाची आहे. यातच आचार्य सांगताहेत की त्यांना माहिती आहे हे यौवनादिक टिकणारे नाहीत. शाश्वत सुखाचा आधार नाहीत. जर गंधर्वकन्यांचे सौंदर्य शाश्वत नसेल तर आपले कसे असेल? शाश्वत आहे केवळ ज्ञान. आई जगदंबा त्या ज्ञानाला प्रदान करते. त्यामुळे गंधर्वकन्या तिला आदर देत आहेत. तिची सेवा करीत आहेत.
दीनानाम् – हीन,दीन भक्तांचे,
अतिवेलभाग्य- अत्यंत श्रेष्ठ सौभाग्य,
जननीं- निर्माण करणारी.
अर्थात त्यांना श्रेष्ठ भाग्य प्रदान करणारी.
दिव्याम्बरालंकृतां- दिव्य वस्त्र धारण केलेल्या,
श्रीशैलस्थलवासिनीं भगवतीं श्रीमातरं भावये- श्रीशैल पर्वतावर निवास करणाऱ्या आई जगदंबेचे मी ध्यान करतो.
— विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply