जय योगीश्वर दत्त दयाळ ! तू ज एक जगमां प्रतिपाळ
हे योगीश्वर दयाळु दत्तप्रभू ! तुझा जयजयकार असो ! या जगामध्ये तूं च एकमात्र रक्षण करणारा आहेस.
अत्र्यनसूया करी निमित्त, प्रगट्यो जगकारण निश्चित ।
अत्रि ऋषि आणि अनसूयामाता यांना निमित्त्य करून या जगासाठी खरोखर तूं प्रगट झाला आहेस.
बह्माहरिहरनो अवतार, शरणागतनो तारणहार ।
तूं ब्रह्मा, विष्णु (हरि) आणि शंकर (हर) यांचा अवतार आहेस आणि जो तुला शरण येतो, त्याला तूं या भवसागरातून तारून नेतोस.
अंतर्यामी सतचित् सुख, बहार सद्गुरु द्विभुज सुमुख ।
तूं अंतरंगात सच्चिदानंदरूपाने नियमन करणारा आहेस आणि बाह्य स्वरूपात दोन हात आणि सुंदर मुख असलेला असा सद्गुरु रूप आहेस.
झोळी अन्नपूर्णा कर मांह्य, शांति कमंडल कर सोहाय ।
क्यांय चतुर्भुज षड्भुज सार । अनंतबाहु तूं निर्धार ॥६॥
तुझे हातात असलेली ही झोळी, जणू काय अन्नपूर्णाच आहे आणि तुझे हाती असलेले हे कमंडलू शांतीचे प्रतीक आहे. कोठे कोठे तूं चतुर्भुज स्वरूपात आहेस, तर कोठे तूं षड् भुजा धारण केलेल्या आहेत, परंतु खरोखर पाहू जाता तूं तर अनंत बाहूधारी आहेस.
आव्यो शरणे बाळ अजाण, ऊठ दिगंबर चाल्या प्राण ।
एक अबोध बालक तुला शरण आलेला आहे. हे दिगम्बरा ! तू उठ. आता
त्याचा प्राण जाईल अशी स्थिती आहे.
सूणी अर्जून केरो साद, रीझ्यो पूर्वे तूं साक्षात् ।
दीधी ऋद्धि सिद्धि अपार, अंते मुक्ति महापद सार ।
पूर्वी तूं सहस्त्रार्जुनाचा धावा ऐकून तूं स्वतः प्रसन्न झाला होतास. आणि त्याला अनेक विध ऋद्धि आणि सिद्धि दिल्या होत्या, त्यानंतर शेवटी मुक्ती देऊन महापद दिले होते.
कीधो आजे केम विलंब? तुज विण मुजने ना आलंब ॥१०॥
तेंव्हा मग आजच कां एवढा विलंब करीत आहेस? मला तुमचे शिवाय कुणाचाही आधार (सहारा) नाही.
विष्णुशर्म द्विज तार्यो ओम, जम्यो श्राद्धमां देखी प्रेम ।
विष्णुशर्मा यांचे प्रेम पाहून तूं श्राद्धाचेमध्ये जेवण घेतले आणि त्यांचा उद्धार केलास.
जंभदैत्यथी त्रास्या देव, कीधी म्हेर तें त्यां ततखेव ।
विस्तारी माया; दितिसुत इंद्रकरे हणाव्यो तूर्त ।
जंभ नावाचे राक्षसाचे त्रासाने जेंव्हा देव त्रासले होते, तेंव्हा तुम्ही त्यांना ताबडतोब मदत केली होती. तुम्ही त्यावेळी आपले मायेचे आवरण घालून इंद्राचे हाताने त्या राक्षसाचा लागेच वध केला होता.
एवी लीला कंई कंई शर्व कीधी वर्णवे को ते सर्व? ॥१४॥
अशा प्रकारच्या अनेक लीला भगवान शंकराने (शर्व) केल्या आहेत. त्या सर्व लीलांचे वर्णन कोण करू शकेल?
दोड्यो आयु सुतने काम, कीधो ने तें निष्काम ।
आयुराज पुत्रासाठी आपण धावत गेला आणि त्याला निष्काम (कामनारहित ) केले.
बोध्या यदु ने परशुराम साध्यदेव प्रल्हाद अकाम ।
आपण यदुराजाला, परशुरामाला, साध्यदेवाला आणि निष्काम अशा प्रल्हादाला उपदेश केला होता.
एवी तारी कृपा अगाध ! केम सूणे ना मारो साद?
अशी तुझी कृपा अगाध असताना तू माझी हांक मात्र का ऐकत नाहीस?
दोड, अंत ना देख अनंत ! मा कर अधवच शिशुनो अंत ॥१८॥
हे अनंत ! धावत ये, माझा अंत पाहू नकोस. या बालकाचा अधेमधेच अंत करू नकोस.
जोई द्विजस्त्री केरो स्नेह, थयो पुत्र तूं निःसंदेह ।
ब्राह्मण स्त्रीचे प्रेम पाहून तू खरोखर तिचा पुत्र झालास.
स्मर्तृगामी कलितार कृपाळ! तार्यो धोबी छेक गमार ।
हे स्मरण करताच धावत येणाऱ्या, कलियुगामध्ये तारून नेणाऱ्या, हे कृपाळू, तू तर अगदी अडाणी अशा धोब्याला पण उद्धारले आहेस.
पेटपीडथी तार्यो विप्र ब्राह्मणशेठ उगार्यो क्षिप्र
आपण पोटशूळाचे दु:खापासून ब्राह्मणाला वाचविले आणि व्यापारी ब्राह्मण शेठला वाचविले.
करे केम ना मारी व्हार? जो आणीगम एकच वार ||२२||
देवा ! तू माझ्या मदतीला का बरे धावत नाहीस? तू एकदाच माझ्याकडे पाहा.
शुष्क काष्टने आण्या पत्र ! थयो केम उदासीन अत्र?
वाळलेल्या लाकडाला पालवी फुटली अशी तुझी कृपा असताना माझी मात्र तू का उपेक्षा करीत आहेस?
जर्जर वंध्या केरा स्वप्न, कर्या सफळ तें सुतना कृत्स्न ।
हे देवा ! वृद्ध अशा वंध्या स्त्रीला पुत्र देऊन तिची सर्व स्वप्ने साकार केलीस, तिचे मनोरथ पूर्ण केलेस.
करी दूर ब्राह्मणनो कोढ, कीधा पूरण एना कोड ।
हे दत्तात्रेय प्रभू ! तूं ब्राह्मणाचे कोड बरे करून त्याचे मनाची ईच्छा पूर्ण केलीस.
वंद्या भेंस दूझवी देव, हर्युं दारिद्र्य तें ततखेव ।
हे दत्तात्रेय प्रभू ! आपण वांझ म्हशीला दूभती केलीत आणि त्या ब्राह्मणाचे दारिद्र्य दूर केलेत.
झालर खाई रीझ्यो एम, दीधो सुवर्णघट सप्रेम ।
त्याचप्रमाणे श्रावण घेवड्याच्या शेंगांची भाजी खावून, आपण त्या ब्राह्मणाला प्रेमपूर्वक सोन्याने भरलेला हंडा दिलात.
ब्राह्मण स्त्रीनो मृत भरथार, कीधो सजीवन तें निर्धार।
आपण खरोखर ब्राह्मण स्त्रीचे मृत पतीला जीवदान दिले.
पिशाच-पीडा कीधी दूर, विप्रपुत्र उठाड्यो शूर ।
पिशाच्च पीडा दूर करून, आपण मृत ब्राह्मण पुत्र पुनश्च जीवंत केलात.
हरी विप्रमद अंत्यजहाथ, रक्ष्यो भक्त त्रिविक्रम तात ॥३०॥
हे मायबाप ! आपण एका हरिजनाचे माध्यमातून ब्राह्मणाचे गर्वाचे हरण करून त्याचा गर्व उतरविला आणि त्रिविक्रम नावाचे भक्ताचे रक्षण केले.
निमेषमात्रे तंतुक ओक, पहोंचाड्यो श्रीशैले देख ।
तंतूक नामक एका भक्ताला एका क्षणांत श्रीशैल पर्वतावर पोहोचवून दिले.
अेकी साथे आठ स्वरूप, धरी देव बहुरूप अरूप ।
संतोषा निज भक्त सुजात, आपी परचाओ साक्षात् ।
हे देवा! आपण निर्गुण असूनही अनेक रूपे धारण करूं शकता. त्यामुळे एकाच वेळी आठ भक्तांचे घरी भोजनास जाऊन आपण सर्व भक्तांना संतुष्ट केले, आपल्या साक्षित्त्वाची प्रचिती दिली.
यवनराजनी टाळी पीड, जातपातनी तने न चीड ॥३४॥
हे परमेश्वरा ! आपण यवन (मुसलमान) राजाची शारीरिक व्याधी दूर आपणास जातीभेद किंवा श्रेष्ठ-कनिष्ठ या गोष्टींबद्दल काहीही फरक वाटत नव्हता.
रामकृष्णरूपे तें अेम; कीधी लीलाओ कंई तेम ।
हे दत्त दिगम्बरा ! आपण राम आणि कृष्णाचा अवतार धारण करून अनेक प्रकारच्या लीला केल्या आहेत.
तार्यां पथ्थर गणिका व्याध । पशुपंखी पण तुजने साध ।
हे दिगम्बरा ! दगड, वेश्या, शिकारी, वगैरेचा पण तू उद्धार केला आहेस. पशु आणि पक्षी पण तुझ्यातील साधुता (ईश्वरी भाव) जाणून आहेत.
अधम ओधारण तारूं नाम, गाता सरे न शा शा काम?
हे दत्तप्रभू ! तुझे नामस्मरण पापी माणसाला पण पावन करणारे आहे. तुझे नामस्मरण केल्याने कोणते काम होत नाही?
आधि व्याधि उपाधि सर्व टळे स्मरण मात्रथी शर्व ॥३८॥
हे शिवशंकरा ! तुझे नुसते स्मरण केल्याने आधि, व्याधी आणि सर्व उपाधी (त्रास) नष्ट होतात.
मूठचोट ना लागे जाण, पामे नर स्मरणे निर्वाण ।
हे दत्तप्रभू! तुझे स्मरण केल्याने मूठ मारणे इत्यादी प्रकारचा त्रास होत नाही आणि मनुष्य मोक्ष पद प्राप्त करतो.
डाकण शाकण भेंसासुर, भूत पिशाचो जंद असुर ।-
नासे मूठी दईने तूर्त, दत्तधून सांभाळतां मूर्त।
या दत्त नामाची धून म्हणता- दत्तबावनी गाता डाकिण, शाकिण, म्हैशासूर, भूत, पिशाच्च, जंद, असुर हे सर्व घाबरून पळून जातात, असा अनुभव आहे.
करी धूप गाए जे अेम दत्तबावनी आ सप्रेम ।
जो कोणी धूप लाऊन ही दत्तबावनी प्रेमपूर्वक म्हणतात.
सुधरे तेना बंने लोक, रहे न तेने क्यांये शोक ।
दासी सिद्धि तेनी थाय, दुःख दारिद्र्य तेनां जाय ।
(जो प्रेमपूर्वक दत्तबावनी म्हणतो) त्याला इहलोकी सौख्य प्राप्त होते व अंती मोक्ष प्राप्ती होते. त्याला कोणत्याही प्रकारचे दुःख राहात नाही. सिद्धि तर जणूं काय त्याची दासी होते आणि त्याला कधीही दुःख व दारिद्र्य प्राप्त होत नाही.
बावन गुरुवारे नित नेम, करे पाठ बावन सप्रेम ।
यथावकाशे नित्य नियम, तेने कदी न दंडे यम ।
जे कोणी बावन्न गुरुवार नियमांचे पालन करून नेहमी दत्तबावनीचे बावन्न पाठ प्रेमपूर्वक करतात किंवा जसा वेळ मिळेल तसे नेहमी नियमांचे पालन करून पाठ करतात त्यांना यमराज कधीच शिक्षा करीत नाही.
अनेक रूपे अज अभंग, भजतां नडे न माया-रंग ।
हा दत्त दिगम्बर जरी अनेक स्वरूपात असला तरी त्याचे मूळ स्वरूप कायम असते, त्यात फरक पडत नाही. या दत्त प्रभूची उपासना करीत असताना माया-मोह हे त्रास देत नाहीत.
सहस्र नामे नामी अेक, दत्त दिगम्बर असंग छेक ॥४८॥
या दत्त दिगम्बराला अनेक विध नामे असूनही तो मात्र दत्त दिगम्बर एकच आहे आणि तो सर्व माया मोहापासून दूर अलिप्त असा आहे.
वंदु तुजने वारंवार, वेद श्वास तारा निर्धार ।
हे दत्तप्रभो ! मी तुम्हाला वारंवार वंदन करीत आहे. खरोखर, हे वेद आपल्या श्वासातूनच प्रगट झाले आहेत.
थाके वर्णवतां ज्यां शेष कोण रांक हुं बहुकृतवेष?
जेथे हे दत्तात्रेया, तुझे वर्णन करतांना शेष सुद्धा थकून जातो, तेथे अनेक जन्म घेणाऱ्या माझ्यासारख्या पामराची काय क्षिती?
अनुभव तृप्तिनो उद्गार, सूणी हसे ते खाशे मार ।
दत्तबावनी हे अनुभवाचे बोल आहेत. टिकाकाराचे दृष्टिकोनातून पाहिले तर त्याला प्रायश्चित्त भोगावे लागेल.
तपसी तत्त्वमसि अे देव ! बोलो जय जय श्री गुरुदेव ॥५२॥
श्री दत्त देव हे तपसी व तेच निर्गुण ब्रह्मस्वरूप आहेत. म्हणून सर्वांनी आवर्जून हे
‘जय जय श्री गुरुदेव’ म्हणा.
॥ गुरुदेव दत्त ॥
Leave a Reply