मार्गशीर्ष पौर्णिमेला अत्री ऋर्षीच्या आश्रमात ब्रह्मा, विष्णू, महेश यांचा एकत्रित अवतार दत्त या नावाने झाला. म्हणून या पौर्णिमेला दत्तजयंती साजरी करतात. त्रिगुण अवतार हे उत्पत्ती, स्थिती आणि लय यांचे कारक आहेत. दत्त उपासना ही प्रखर समजली जाते. म्हणजेच या उपासनेत सोवळं-ओवळं आणि नित्य नियमांची काटेकोरपणे वागणूक करावी लागते.
या सांप्रदायाचा प्रमुख ग्रंथ ‘श्री गुरुचरित्र’ मूळ कानडीत लिहिला गेला. हा सांप्रदाय जास्त करून कर्नाटक – महाराष्ट्रात आढळतो. जास्त क्षेत्रे सुद्धा कर्नाटक – महाराष्ट्रात आढळतात.
विद्याधर करंदीकर
Leave a Reply