नवीन लेखन...

श्री गजानन जय गजानन

असावे मन एकाग्र चित्ती
सगुण साकार कैवल्य मुर्ती,
कितीक गावी तुमचीच महती
महाराजांची अखंड नीनदे कीर्ती…
विदर्भात असेल ग्राम नगरी
पुण्य पावन ही शेगाव पंढरी,
यावे ईथे लिन होऊन नेहमी
महाराजांच्या पुण्य पावन चरणी…
अनेक लीला अगम्य शक्ती
दिगंबर सदा ध्यान करुणाकरी,
मंत्र मुखी शांत भाव सदा मुखी
गण गण गणात बोते कल्याणकारी…
कितीक भक्त कितीक महती
भास्कराच्या कोरड्या विहिरस पाणी येई,
तिमाजीची खळे तुम्ही महाराज राखिसी
हरी पाटलावरी प्रीती तुमची असेल खरी…
याल श्रद्धेने सारे शेगाव नगरी
मिळेल आशीर्वाद सदा मस्तकी,
वर्णावी तुमची कितीक महाराज महती
तुमचे नाम घेता हरतील संकटे खरी…
जय गजानन
श्री गजानन महाराज अष्टक (दासगणूकृत)
गजानना गुणागरा परम मंगला पावना ।
अशींच अवघे हरी, दुरीत तेवि दुर्वासना ।।
नसें त्रिभुवनामधे तुजविन आम्हां आसरा ।
करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ।।१।।
निरालसपणें नसे घडलि अल्प सेवा करी ।
तुझी पतितपावना भटकलो वृथा भूवरी ।
विसंबत न गाय ती आपुलिया कधीं वांसरा ।
करी पदनातावरी बहु दया न रोषा धरा ।।२।।
अलास जगीं लावण्या परतुनी सु-वाटे जन ।
समर्थ गुरूराज ज्या भुषवि नाम नारायण ।।
म्हणून तुज प्रार्थना सतत जोडुनिया करा ।
करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ।।३।।
क्षणांत जल आणिले नसून थेंब त्या वापिला ।
क्षणांत गमनाप्रती करिसि इच्छिलेल्या स्थळा ।
क्षणांत स्वरूपे किती विविध धरिसी धीवरा ।
करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ।।४।।
अगाध करणी तुझी गुरूवरा, न लोकां कळे।
तुला त्यजुनी व्यर्थ ते आचरितात नाना खुळे ।
कृपा उदक मागती त्यजुनी गौतमीच्या तिरा ।
करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ।।५।।
समर्थ स्वरूपप्रती धरून साच बाळापूरी ।
तुम्ही प्रगट जाहलां सुशिल बाळकृष्णा घरी ।
हरिस्वरूप घेऊनि दिधली भेट भीमातिरा ।
करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ।।६।।
सछिद्र नौकेप्रती त्वदिय पाय हे लागतां ।
जलांत बुडतां तरी तिजसी नर्मदा दे हाता ।
अशा तुजसि वाणण्या नच समर्थ माझी गिरा ।
करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ।।७।।
अतां न बहु बोलतां तव पदांबुजा वंदितो ।
पडो विसर ना कदा मदिय हेंचि मी मागतों ।
तुम्ही वरद आपुला कर धरा गणूच्या शिरा ।
करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ।।८।।
गजानन महाराज अष्टक लिंक:
— स्वाती ठोंबरे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..