माघ शुक्ल चतुर्थी रोजी विनायक (गणेशाचा अवतार) याचा कश्यपाच्या घरी जन्म झाला. म्हणून या चतुर्थीला गणेश जयंती असे म्हणतात. या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी, वरद चतुर्थी अशी नांवे आहेत.
या दिवशी नक्त व्रत करतात. गणेशाची पूजा करून तिल व आज्य (तूप) यांचे हवन करतात. गणेशाला तिलाच्या लाडवांचा नैवेद्य अर्पण करतात. तसेच या दिवशी कुंदपुष्पांनी महादेवाचे पूजन करावे. असे कूर्म पुराणांत सांगितले आहे.
या दिवशी वरद नावाच्या विनायकाची पूजा करावी आणि पंचमीला परत याची कुंदपुष्पांनी पूंजा करावी. हा या व्रतातील प्रमुख भाग आहे. काही ठिकाणी भाद्रपद व मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल चतुर्थीलाही वरद चतुर्थी म्हणतात.
विद्यादर करंदीकर
Leave a Reply