नवीन लेखन...

गणेशाचे आगमन आणि निर्गमन

आपण गणपतीची मूर्ती आणतो आणि विसर्जन करतो. काय आहे त्या मागचे रहस्य ?

श्री गजाननाच्या कृपेने आज मला जे काय सुचले ते आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. यात कोणाच्या भावना, श्रद्धा दुखावण्याचा हेतू नसून. जे पहिल्यापासून अस्तित्वात आहेच ते आपल्या समोर ठेवीत आहे. यातून आपल्याला एक नवीन दृष्टिकोन प्राप्त होईल ही १००% खात्री आहे.

हा लेख अतिशय सूक्ष्म व तत्वनिष्ठ आहे आणि सूक्ष्म गोष्टींचे अवलोकन करायला अख्खी प्रयोगशाळा उभारावी लागते.. तसाच हा लेखप्रपंच पण मोठा आहे. तरी आपण वेळ काढून शांतपणे वाचावा ही नम्र विनंती.

दर वर्षी भाद्रपद चतुर्थीला आपण गणपती आणतो. आणि म्हणतो “घरोघरी गणपती आले.” किंवा “आमच्या घरी गणपती आला.” किंवा “आमच्या घरी गणपती असतो.”

नक्की काय आहे हे?

आपल्या जीवनात पंचमहाभूतांचे महत्व आपण जाणतोच! पृथ्वी तत्व, आकाश तत्व, वायू तत्व, जल तत्व व अग्नी तत्व या सर्व पाच गोष्टीनी पंचमहाभुत हे तत्व बनते. याचे योग्य समतोल व प्रमाणच सर्व काही व्यवस्थित छान ठेवते. आपल्या जीवनात या पाच गोष्टीना अनन्यसाधारण महत्व आहे. या पैकी कोणत्याही एकाचा तत्वाचा मोठा किंवा लहान किंवा अती सूक्ष्म बदल आपल्या जीवनावर परिणाम घडवू शकतो. आपले शरीर व प्रत्येक गोष्ट ही याच पंचमहाभूतां पासून बनले आहे.(याचे कारक आहेत) काय आहेत ही पाच तत्वे? ( बेसिक प्रिंसिपल्स )

१) पृथ्वी तत्व (आधुनिक विज्ञानात याला बेस, प्लॅटफॉर्म, फाऊंडेशन म्हणतात )
जर पृथ्वी तत्व हलले तर भूकंप येऊ शकतो किंवा पृथ्वीतत्वात काही बदल झाला. किंवा पृथ्वीत जर काही घडामोडी घडल्या. मोठ्या व सूक्ष्म प्रमाणात तर आपल्या जीवनावर त्याचा निश्चित चांगला किंवा वाईट परिणाम होतो. पृथ्वी तत्व म्हणजे जडपणा. पृथ्वी म्हणजे धरणी माता. ज्या वर सर्व फिट केलेले असते. जसे कॉम्प्युटरचा मदर बोर्ड. तसेच बरेच काही आपल्याला पृथ्वी च्या पोटातून प्राप्त होत असते. व त्याचा दृश्य व अदृश्य परिणाम आपल्या जीवनावर होत असतो.

२) आकाश तत्व
(विज्ञानात याला स्पेस म्हणतात ) प्रत्येक गोष्टीला फिरण्यास आवश्यक मोकळी जागा लागते, या आकाश तत्वाने वावरण्यास किंवा फिरण्यास ठराविक मोकळी जागा/ पोकळी / स्पेस मिळते. विचार करण्यासाठी एकांत लागतो आणि जर अशी ठराविक मोकळी जागा नाही मिळाली तर ? घुसमट होते आणि मिळाली तर ? आपण फ्री होतो. हे आपणास माहीत आहे. म्हणतात ना जाम झाले. चोकअप झाले. म्हणजे फिरण्यासाठी किंवा जाण्यासाठी आवश्यक जागा नाही मिळाली. बरोबर ना? यालाच आकाश तत्व म्हणतात. शेवटी अवकाश म्हणजे पोकळीच (आवश्यक मोकळी जागा) ना?

जर इंटर्नल स्पेस योग्य नसेल तर कॉम्पुटर पण स्लो होतोच ना.

३)वायू तत्व
वातावरण, शुद्ध हवा, प्राण वायू, पोल्युशन, निरनिराळे गॅस, वातवरणातील कंपन, लहरी, मोबाइल रेंज, हवेचे तापमान व इतर बरच काही जे हवेशी वातावरणाशी निगडित आहे ते वायू तत्वात येते.
वायू तत्वात काही बदल झाला. ( तापमानात/वातावरण ) काही बदल झाला तर सर्व ठिकाणी त्याचा बदल जाणवतोच.
कॉम्प्युटरला पण कुलिंग फॅन असतोच की ! आणि टीव्ही मोबाइल रेडिओला कंपनलहरी /रेंज लागतातच की!

४) जल तत्व
जल म्हणजे पाणी व सृष्टीत ७०ते८०%पाणी आहे.
तसेच जलात / पाणी किंवा द्रव पदार्थ यात काही बदल झाला तर परिणाम हा ठरलेलाच. जास्त पाऊस पडला तर पूर स्थिती, आणि कमी पाऊस पडला तर दुष्काळ! म्हणजे समतोल हा आलाच. हवेत ओलसर पाणा / दमट पणा आला की साधारण सर्दी किंवा श्वसनाचे विकार झाले म्हणून समजा व हवेत दमट पणा ओलसर पणा आला तर कॉम्पुटर पण मॉयश्चर पकडतो की! जल तत्व हे सर्व द्रव पदार्थाचे कारक असते.

५) अग्नितत्व
(याला आपण ऊर्जा / एनर्जी, पॉवर असे म्हणतो)
मुख्य ऊर्जा ही सूर्या पासून मिळते. अग्नी तत्व म्हणजे ऊर्जा होय. शरिरात जठराग्नी असतोच की. अग्नी तत्वात प्रकाश किरणे आली. ज्याने आपल्याला दृश्य दिसतात. या अग्नी तत्वात काही बदल झाला तर आपल्या जीवनावर याचां पूरक तसाच मारक परिणाम होतो. कॉम्प्युटरला पण पॉवर सप्लाय साठी SMPS असतो की ! या वरील ५ तत्वाचे समतोल आपल्या जीवनात खूपच आवश्यक आहे. जर यात सूक्ष्म किंवा मोठा बदल झाला तर त्याचा परिणाम सृष्टीवर(निसर्गावर ) निश्चितच होतो. आणि ही समतोल  पाच तत्वे मिळूनच अख्खा निसर्ग बनलेला असतो. सजीव व निर्जीव वस्तू याचे कारक असतात. आपली घर व आपण निसर्गाचाच एक भाग आहोत. आपण कायमच या पाचही तत्वाच्या अमलाखली येतो. राहतो व वावरत असतो आणि पंचमहाभूत या तत्वाचा
आपल्या जीवनावर निश्चित परिणाम होत असतो. जसा काळ हा कोणासाठी थांबत नाही तसा कोणी मानो वा ना मानो या पाचही तत्वाचा आपल्या जीवनावर परिणाम हा होतच असतो.

जसे मदर बोर्ड, मेमरी / hard-disk स्पेस, कुलिंग, मॉयश्चर, SMPS यात थोडा जरी बदल झाला तर त्याचा परिणाम कॉम्प्युटर वर नक्कीच होतो. पण तो फॉल्ट आपल्याला समजत नाही. त्या साठी तज्ञाची ( कॉम्प्युटर इंजिनियरची) अावश्यकात असते.

तसेच पंचमहाभूत या तत्वाचा आपल्या जीवनावर निश्चित चांगला व वाईट परिणाम होत असतो. पण तो आपल्या लक्षात येत नाही. जाणवत नाही. त्यातील तज्ञ मंडळींनाच तो समजतो.

आणि हो!

आपले पूर्वज हे अतिशय तज्ञ व हुशार होते. त्यांना या सर्व गोष्टींचे उत्तम ज्ञान, आकलन होते.

म्हणून त्यांनी ही गणपतीची प्रथा सण साजरा करण्याची परंपरा सुरू केली.

आपण जी गणपतीची मूर्ती (पारंपरिक) आणतो, गणपतीची मूर्ती बनवताना या पाच त्वचा वापर केला जातो. आता नीट लक्ष देऊन वाचलत. तरच आपल्या लक्षात काही गोष्टी येतील व आपल्याला नवीन दृष्टिकोन प्राप्त होण्यास मदत होईल.

मूर्ती साठी लागणारी माती, मूर्तीचा जडपाणा/ जडत्व म्हणजे पृथ्वी तत्व.
पाण्यात भिजवतात, ओल्या रंगात रंगवताना म्हणजे आले जल तत्व.
मूर्ती सुकण्याची (वाळण्याची)प्रक्रिया म्हणजे आले वायू तत्व.
मूर्ती बनवायला लागते ती मोकळी जागा, म्हणजे आले आकाश तत्व.
मूर्ती बनवताना वापरतात ती एनर्जी, लागणारा योग्य उजेड व घरी आणून आपण मूर्ती ची प्राण प्रतिष्ठापना करतो. आणि धूप, दीप लावतो, ते झाले अग्नी तत्व.

म्हणजे आपण प्रत्यक्ष पंचमहाभूतांचे प्रतीक आपल्या घरी आणतो. व त्याची श्री गणेशाची मूर्ती म्हणून स्थापना करतो.

आता ही मूर्ती कशी तर एकदम वेगळी! लहानपासून मोठ्यानं पर्यंत सगळ्यांना आवडते. अशी लोभस असते. बाप्पाचे पोट मोठे कशाला ? तर सर्वांचे अपराध पोटात घालायला. कान मोठे का ? तर ऐकून घ्यायला. ह्या सर्व गोष्टी आपणाला माहीतच आहेत.शेप कसा तर एकदम एरोडेनामिक. वातावरण उल्हसित प्रफुल्लित करणारी. मंगलमय, समृद्धी व बुद्धीची देवता.

आपण आता पर्यंत बघितलेली अशी ही सर्व तत्वे मिळून गणेश तत्व बनते. त्या तत्वाचे प्रतीक म्हणून व आपल्या घरातील समतोल साधण्या साठी आपण गणेशाची मूर्ती (या सर्व तत्वाचे प्रतीक)घरी आणतो. व स्थापना करतो

ही सर्व तत्वे सृष्टीत असतातच (आपल्या घरी पण असतातच) मग घरी का आणावी लागतात ? आपले घर व आपण पण सृष्टीचेच भाग आहोत ना?

हो बरोबर आहे! पण आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनातील वावरानी ही तत्वे थोड्या फार प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात विस्कळीत होतात. ती पूर्ववत यावीत व्यवस्थित व्हावीत. त्यांचा आपल्या वागण्याने बिघडलेला समतोल परत साधण्या साठी हा आपला प्रयत्न असतो. म्हणजेच हल्लीच्या भाषेत सांगायचे तर ते एक प्रकारचे (हे गणेश तत्व) रिफ्रेश करणे किंवा सर्व्हिसिंग करणेच असते असे मला वाटते. म्हणजे आपण आपल्या सृष्टीत आणि घरी असलेले गणेश तत्व अबाधित राखण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून आपण गणेशाच्या मूर्तीची स्थापना करतो. अगदी दर वर्षी सर्व्हिसिंग !(गणेश तत्वाची) थोडी भाषा मॉडर्न आहे पण सत्य आहे.

म्हणजे आपण प्रतीकात्मक गणेश तत्वाची, मूर्ती रूपाने स्थापना करतो.

मग विसर्जन करतो ते काय ?

आले लक्षात ? आपण नुसती फक्त मूर्ती (संपूर्ण गणेश तत्वाचे प्रतीक असलेली) विसर्जन करतो. आणि गणेश तत्व आपल्याच घरी सदैव अबाधित ठेवतो व संपूर्ण गणेश तत्व अबाधित राहण्या साठी हा सण सोहळा प्रथा आपल्या पूर्वजांनी सुरू केला. व आपण हा सारा खटाटोप या साठीच करतो.

जसे चहा प्यायलो. असे न म्हणता बरेच जण म्हणतात चहा मारला. फोन मारला. तसेच आपण सहज म्हणतो. गणपती आणला आणि विसर्जन केला!

लक्षात आलेना या मागचे सूक्ष्म शास्त्र ?
बदलला ना आपला दृष्टीकोन ?
गणपती गेले तरी गणेश तत्व गेले का ? नाही ते आपल्या घरात अजूनही अदृश्य रुपात आहे.

जर आवडले तर नक्की शेअर करा! आणि हो,

पुढच्या वर्षीच्या गणेश तत्वाची स्थापना एका नवीन दृष्टिकोनातून करा.

धन्यवाद!
जय गणेश, श्री गणेश

— © शैलेश सो. महाजन
(फ्रीलानसर कंटेंट रायटर )
बदलापूर
varadsm@gmail.com

Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप 374 Articles
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..