नवीन लेखन...

श्रीकामाक्षीसुप्रभातम् – मराठी अर्थासह – भाग २

॥ श्रीकामाक्षीसुप्रभातम् ॥ 

मराठी अर्थासह – भाग २

पश्यांब केचित्फलपुष्पहस्ताः
केचित्पुराणानि पठन्ति मातः ।
पठन्ति वेदान्बहवस्तवाग्रे
तेषां जनानां कुरु सुप्रभातम् ॥ ११॥

मराठी– बघ माते, काहीजण हातात फळे, फुले घेऊन (उभे आहेत). काही जण मातेची (तुझी) पुराणे वाचत आहेत. काही जण तुझ्या समोर वेदपठण करीत आहेत. त्या सर्व जनांची सकाळ तू मंगलमय कर.

पुष्पे फुले घेउन लोक हाती
कोणी पुराणां तव माय गाती ।
चाले समोरी तव वेदघोषा
देई सुमंगल पहाट जनास ऐशा ॥ ११


लावण्यशेवधिमवेक्ष्य चिरं त्वदीयम्
कन्दर्पदर्पदलनोऽपि वशं गतस्ते ।
कामारिचुम्बितकपोलयुगं त्वदीयं
द्रष्टुं स्थिताः वयमये कुरु सुप्रभातम् ॥ १२॥

मराठी– तुझ्या सौंदर्याचा अविनाशी ठेवा पाहून मदनाच्या तो-याचा नाश करणारा सुद्धा तुला वश झाला. मदनरिपूने चुंबिलेले तुझे दोन्ही गाल पाहण्यासाठी आम्ही उभे आहोत. आमची सकाळ तू मंगलमय कर.

पाहून श्रेष्ठ तव संचय चारुतेचा
नाशी अनंगरग, हो तव दास साचा ।
चुंबी जया हर, कपोलयुगुला पहाया
आम्ही उभे, सुरु करी सुभगा दिना या ॥ १२


गाङ्गेयतोयमवगाह्य मुनीश्वरास्त्वां
गङ्गाजलैः स्नपयितुं बहवो घटांश्च ।
धृत्वा शिरःसु भवतीमभिकाङ्क्षमाणाः
द्वारि स्थिता हि वरदे कुरु सुप्रभातम् ॥ १३॥

मराठी– हे वरदायिनी, श्रेष्ठ मुनी गंगेमध्ये स्नान करून तुला गंगाजलाने स्नान घालण्यासाठी अनेक कलश  मस्तकावर धारण करून तुला अभिषेक करण्यासाठी इच्छुक दारापाशी उभे आहेत. तू (त्यांची) पहाट मंगलमय कर.

गंगेत स्नान करुनी मुनिसाधकांनी
प्रक्षालना तव जले कळशा भरूनी ।
दारी, शिरी तुजवरी अभिषेक होण्या
आहे उभे, कर सुकाल पहाट त्यांना ॥ १३


मन्दारकुन्दकुसुमैरपि जातिपुष्पैः
मालाकृताविरचितानि मनोहराणि ।
माल्यानि दिव्यपदयोरपि दातुमंब
तिष्ठन्ति देवि मुनयः कुरु सुप्रभातम् ॥ १४॥

मराठी– मंदार, कुंद,मोगरा या फुलांच्या आकर्षक माळा तयार करून रचून ठेवल्या आहेत. (त्या तुझ्या) स्वर्गीय पावलांवर अर्पण करण्यासाठी मुनी थांबले आहेत. (तू त्यांची) सकाळ मंगलमय कर.

मंदारकुंदकुसुमे अन मोगराही
गुंफून हार रचले अति रम्य पाही ।
ते हार दिव्य चरणावर अर्पिण्याला
थांबे मुनी शुभ सकाळ करी तयाला ॥ १४


काञ्चीकलापपरिरंभनितम्बबिम्बम्का
श्मीरचन्दनविलेपितकण्ठदेशम् ।
कामेशचुम्बितकपोलमुदारनासां
द्रष्टुं स्थिताः वयमये कुरु सुप्रभातम् ॥ १५॥

मराठी– हे देवी, मेखलेने वेढा घातलेले गोलाकार नितंब, काश्मीर देशीच्या चंदनाचा लेप दिलेला गळा, मदनाला जिंकणा-या शंकराने चुंबन घेतलेला गाल, धारदार नाक या सर्वांचे दर्शन घेण्यासाठी आम्ही उभे आहोत. आमची सकाळ मंगल कर.

वेढी तुझा कमरपट्ट नितंबगोलां
काश्मीरचंदन उटी अवलेपिली गळां ।
रेखीव नाक, हर-चुंबित पाहण्याला
गालां, उभे, कर पहाट सुखी अम्हाला ॥ १५  


मन्दस्मितं विमलचारुविशालनेत्रम्क
ण्ठस्थलं कमलकोमलगर्भगौरम् ।
चक्राङ्कितं च युगलं पदयोर्मृगाक्षि
द्रष्टुं स्थिताः वयमये कुरु सुप्रभातम् ॥ १६॥

मराठी– हे हरणासमान नेत्र असलेल्या कामाक्षी, तुझे मंद हास्य करणारे निष्कलंक सुंदर आणि विशाल नयन, कमळाच्या नाजुक गाभ्यासमान असणारा गोरा गळा, आणि ज्यावर चक्र आहे असी पावलांची जोडी पाहण्यासाठी आम्ही उभे आहोत. (तू आमची) सकाळ मंगलमय कर.

अस्फूट हास्य चमके नयनात गो-या
गाभाच नाजुक गळा कमळात गोरा ।
दोन्ही पदी वलयचिन्हहि रेखिले ते
आम्हा करी शुभप्रभात बघावयाते ॥ १६


मन्दस्मितं त्रिपुरनाशकरं पुरारेः
कामेश्वरप्रणयकोपहरं स्मितं ते ।
मन्दस्मितं विपुलहासमवेक्षितुं ते
मातः स्थिताः वयमये कुरु सुप्रभातम् ॥ १७॥

मराठी– नगरांचा शत्रू (शंकरा)चे तीनही नगरे नाश करणारे स्मित हास्य,(तर) मदनावर विजय मिळवणा-या (शंकरा)चा आवेग शमवणारे तुझे स्मित. हे आई, तुझ्या त्या समृद्ध हास्याचा प्रत्यय घेण्यासाठी आम्ही उभे आहोत. आमची सकाळ सुखद कर.

हासू विनाशकर तीन पुरां हराचे
कामारि-प्रीत रुसवा शमवीत साचे ।
समृद्ध हास्य तव प्रत्यय घ्यावयाते
आम्हा करी शुभप्रभात बघावयाते ॥ १७   


माता शिशूनां परिरक्षणार्थम्न
चैव निद्रावशमेति लोके ।
माता त्रयाणां जगतां गतिस्त्वम्स
दा विनिद्रा कुरु सुप्रभातम् ॥ १८॥

मराठी– या जगतात आई आपल्या बालकांच्या रक्षणासाठी झोपेच्या तावडीत सापडत नाही. तू तर तिन्ही जगांची आई आहेस आणि तिन्ही जगे चालवतेस. नेहेमी जागृत असतेस. आमची सकाळ शुभप्रद कर.

ठेवी मुलांना सुखरूप आई
जगी, न झोपेत गुडूप होई ।
तीन्ही जगां साथ तुझी नि जागी
सदैव, होवो सुसकाळ लागी ॥ १८


मातर्मुरारिकमलासनवन्दिताङ्घ्र्याः
हृद्यानि दिव्यमधुराणि मनोहराणि ।
श्रोतुं तवांब वचनानि शुभप्रदानि
द्वारि स्थिता वयमये कुरु सुप्रभातम् ॥ १९॥

मराठी– विष्णू आणि ब्रह्मदेव यांनी जिच्या चरणांना नमन केले आहे अशा आईचे – तुझे हृद्य, स्वर्गीय, गोड रमणीय बोल ऐकण्यासाठी आम्ही दारावर उभे आहोत. हे माते तू आमची सकाळ शुभप्रद कर.

ब्रह्मा हरी नमन ज्या चरणां करीती
स्वर्गीय हृद्य बरवी वचने सुनीती ।
ते ऐकण्या शुभ तुझे मधु बोल माते
दारी उभे, शुभप्रभात करी अम्हाते ॥ १९


दिगंबरो ब्रह्मकपालपाणिः
विकीर्णकेशः फणिवेष्टिताङ्गः ।
तथाऽपि मातस्तव देविसङ्गात्
महेश्वरोऽभूत् कुरु सुप्रभातम् ॥ २०॥

मराठी– हे देवी माते, विवस्त्र अवस्थेत असलेला, हाती ब्रह्मदेवाचे (छाटलेले) मस्तक धरलेला, केस विस्फारलेले, अंगाभोवती साप गुंडाळलेले अशा अवस्थेतला शंकर मात्र तुझ्या सहवासाने देवांमध्ये श्रेष्ठ (महेश्वर) झाला. तू आमची सकाळ शुभप्रद कर.

विवस्त्र, हाती शिर आत्मभूचे
पिसाट केसां विळखे फणीचे ।
परंतु संगे तव तोच झाला
महेश, देई शुभप्रातकाला ॥ २०  


अयि तु जननि दत्तस्तन्यपानेन देवि
द्रविडशिशुरभूद्वै ज्ञानसम्पन्नमूर्तिः ।
द्रविडतनयभुक्तक्षीरशेषं भवानि
वितरसि यदि मातः सुप्रभातं भवेन्मे ॥ २१॥

मराठी– अगे माते देवी, तुझ्या स्तनातून मिळालेले दूध प्यायल्याने द्रविड बालक खरोखरी मूर्तिमंत ज्ञानी बनला. हे भवानी, (त्या) द्रविड बालकाने प्राशन करून राहिलेले दूध जर तू मला दिलेस तर माझी सकाळ शुभप्रद होईल.

जननी तव स्तनीच्या दुग्ध पाना करूनी
द्रविड कुलज मोठा जाहला पूर्ण ज्ञानी
जर मज उरलेले दूध देसी भवानी
मम मनहि सकाळी जाय मोदे भरोनी ॥ २१


जननि तव कुमारः स्तन्यपानप्रभावात्
शिशुरपि तव भर्तुः कर्णमूले भवानि ।
प्रणवपदविशेषं बोधयामास देवि
यदि मयि च कृपा ते सुप्रभातं भवेन्मे ॥ २२॥

मराठी– हे माते, तुझा मुलगा तुझे दूध पिण्याच्या प्रभावामुळे, बालक असूनही त्याने तुझ्या पतीच्या कानात ओंकाराच्या ध्वनीची असाधारणता प्रतिपादन केली. देवी तू मजवर कृपा करशील तर माझी सकाळ शुभप्रद होईल.

जननी तव स्तनीचे प्राशुनी दूध सांगे
तव शिशु सुत मोठे ओम् ध्वनी तथ्य संगे ।
मजवर करुणा हो आज जेवी भवानी
मम मनहि सकाळी जाय मोदे भरोनी ॥ २२

*****************

धनंजय बोरकर (९८३३०७७०९१)

धनंजय मुकुंद बोरकर
About धनंजय मुकुंद बोरकर 60 Articles
व्यवसाय इलेक्ट्रॉनिक (एव्हियॉनिक्स) इंजिनियर. संस्कृत भाषेची आवड. मी केलेले संस्कृत काव्यांचे मराठी गद्य व स्वैर पद्य रूपांतर - १. कविकुलगुरू कालिदासाचे `ऋतुसंहार' (वरदा प्रकाशन, पुणे) २. जयदेवाचे `गीतगोविंद' (प्रसाद प्रकाशन, पुणे). ३. मूकशंकराचार्याचे `मूक पंचशती' ४. जगन्नाथ पंडितांचे `गंगा लहरी' इत्यादी. मी ऋतुसंहार मधील श्लोकांवर आधारित एक दृकश्राव्य कार्यक्रम तयार केला असून त्याचे अनेक कार्यक्रम पुण्यात व इतर ठिकाणीही सादर केले आहेत.

8 Comments on श्रीकामाक्षीसुप्रभातम् – मराठी अर्थासह – भाग २

  1. खूपच सुंदर आणि भावपूर्ण काव्यानुवाद आहे. मराठी भाषेच्या वैभवात भरच पडली आहे. ??????

  2. श्री धनंजय मुकुंद बोरकर यांचे शब्द अचूक आणि धारदार आहेत.
    यात काही वायफळ बडबड नाही. कदाचित शब्द निवडतांना
    त्यांच्यातिल एंजिनिअर जागा होत असावा.

    परंतु त्यांचे शब्द ज्या भावनांचे तरंग आपल्या मनात निर्माण करतात
    ते आपल्याला भक्तिमार्गाने अलगद एका वेगळ्या विश्वात नेऊन सोडतात.

    त्यामुळे त्यांचे भाषा कौशल्य
    हे एखाद्या जादूगाराच्या कौशल्यापेक्षा
    फारसे काही वेगळे असावे असे
    मला आडाण्याला वाटत नाही

    • बोरकर यांच्या या आधीच्या भाषांतरांप्रमाणेच हेदेखील रसाळ,सुलभ झाले आहे. लवकरच यानंतरचेही वाचनात येवो.

  3. श्री धनंजय मुकुंद बोरकर यांचे शब्द अचूक आणि धारदार आहेत.
    यात काही वायफळ बडबड नाही. कदाचित शब्द निवडतांना
    त्यांच्यातिल एंजिनिअर जागा होत असावा.

    परंतु त्यांचे शब्द ज्या भावनांचे तरंग आपल्या मनात निर्माण करतात
    ते आपल्याला भक्तिमार्गाने अलगद एका वेगळ्या विश्वात नेऊन सोडतात.

    त्यामुळे त्यांचे भाषा कौशल्य
    हे एखाद्या जादूगाराच्या कौशल्यापेक्षा
    फारसे काही वेगळे असावे असे
    मला आडाण्याला वाटत नाही.

  4. सुरेख
    ९४२२००५३३७

  5. अतिशय सुंदर विवेचन आणि समजण्यास सोपे असे हे भाषांतर आहे

    धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..