चालली स्पर्धा साऱ्यांची, प्रभूची सेवा करण्याची….।।धृ।।
निशाराणी संचारी
निद्रीत जाई पहारेकरी
खट्याळ वारे धावूनी
दारे दिली उघडूनी
विज चमकूनी आकाशी मदत होई वसुदेवाची….१
चालली स्पर्धा साऱ्यांची प्रभूची सेवा करण्याची
पावसाच्या पडती सरी
पक्षी नाचती तालावरी
कोकीळेचे सुरेल गान
आनंदाने वातावरण
नागराजा फना काढूनी काळजी घेई नव बाळाची….२
चालली स्पर्धा साऱ्यांची प्रभूची सेवा करण्याची
स्पर्श होता पायाचे
पाणी दुभंगले यमुनेचे
वाट त्याची करूनी
काढूनी साऱ्या अडचणी
नंदाघरची कन्या माया दाखवी रूपे चमत्काराची…३
चालली स्पर्धा साऱ्यांची प्रभूची सेवा करण्याची
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply