नवीन लेखन...

श्रीमत् आदिशंकराचार्यांचे श्रीलक्ष्मीनृसिंहपंचरत्नम् मराठी अर्थासह

॥ श्रीलक्ष्मीनृसिंहपंचरत्नम् ॥

…….श्रीमत् शंकराचार्य

नृसिंहपंचरत्न स्तोत्रात श्रीमत् शंकराचार्य मनाला भ्रमराची उपमा देऊन, या वैराण वाळवंटासारख्या जगातील नश्वर गोष्टींमध्ये सुखासाठी वेड्यासारखे फिरण्याऐवजी भगवान लक्ष्मीनृसिंहांच्या श्रीचरणकमलातील शाश्वत मकरंद ख-या आनंदासाठी तू सतत सेवन करावास, असे विविध उदाहरणे देऊन पटवून देतात. हे अवघ्या पाच श्लोकांचे स्तोत्र अतिशय लालित्यपूर्ण आणि मधुर आहे.

 

त्वत् प्रभुजीवप्रियमिच्छसि चेत् नरहरिपूजाम् कुरु सततम्

प्रतिबिंबालंकृतिधृतिकुशलो बिंबालंकृतिमातनुते ।

चेतोभृंग भ्रमसि वृथा भवमरुभूमौविरसायाम्

भज भज लक्ष्मीनरसिंहानघपदसरसिजमकरंदम् ॥ १

मराठी-जर तू आपल्या दैवताची कृपा संपादन करू इच्छित असशील, तर नेहेमी नरसिंहाचे पूजन कर. (आरशातील) प्रतिबिंबाच्या गाभ्याला सजविण्यात कसबी (कलाकार नेहेमी) (मूळ) विषयाला (अगोदर) सजवतो. अरे मनोरूपी भ्रमरा, तू उगीचच कष्टप्रद नीरस सांसारिक वाळवंटात भटकतोस. तू लक्ष्मीनरसिंहाच्या पदकमलांच्या मधा(च्या सेवना)त रममाण हो.

आस कृपेची शमण्या प्रभुच्या नरहरिपूजा सतत करी 

प्रतिमेलागी सजवि न कसबी, बिंबी सुंदर रंग भरी ।

संसारी नीरस पुळणी फिरत वृथा तू मनभृंगा

लक्ष्मी नृसिंह पदकमलीच्या मकरंदा तू सेवत जा ॥ १

शुक्तौ रजतप्रतिभा जाता कटकाद्यर्थसमर्था चेत्

दुःखमयी ते संसृतिरेषा निर्वृतिदाने निपुणा स्यात् ।

चेतोभृंग भ्रमसि वृथा भवमरुभूमौ विरसायाम्

भज भज लक्ष्मीनरसिंहानघपदसरसिजमकरंदम् ॥ २

मराठी– शिंपल्यात निर्माण झालेली चांदीसमान चकचकीत गोष्ट जर बांगडी इत्यादी सारखी होण्यास सक्षम असेल, तर तुझी ही दुःखमय संसार रेखा तुला समाधान देण्यात नक्कीच कुशल असेल. (त्यासाठी) अरे मनोरूपी भ्रमरा, तू उगीचच कष्टप्रद नीरस सांसारिक वाळवंटात भटकतोस. तू लक्ष्मीनरसिंहाच्या पदकमलांच्या मधा(च्या सेवना)त रममाण हो.

चंदेरी शिंपेत झळाळी कंकण बनणे शक्य असे

जीवन रेखा कष्टमयी सक्षम देण्या तुज तोष असे ।

संसारी नीरस पुळणी फिरत वृथा तू मनभृंगा

लक्ष्मी नृसिंह पदकमलीच्या मकरंदा तू सेवत जा ॥

आकृतिसाम्यात् शाल्मलिकुसुमे स्थलनलिनत्वभ्रममकरोः

गंधरसाविह किमु विद्येते विफलं भ्राम्यसि भृशविरसे ।

चेतोभृंग भ्रमसि वृथा भवमरुभूमौविरसायाम्

भज भज लक्ष्मीनरसिंहानघपदसरसिजमकरंदम् ॥ ३

मराठी– रूपात समानता असल्याने तू शाल्मलीच्या फुलाला जमिनीवर फुलणारे कमळ समजून गोंधळला आहेस. (पण) इथे वास आणि रस कोठे आहेत ? काही हाती न लागता तू गोल गोल फिरत आहेस. अरे मनोरूपी भ्रमरा, तू उगीचच कष्टप्रद नीरस सांसारिक वाळवंटात भटकतोस. (त्याऐवजी)  तू लक्ष्मीनरसिंहाच्या पदकमलांच्या मधा(च्या सेवना)त रममाण हो.

फूल जणू भूपद्मच बघता शाल्मलिचे घोटाळा तव झाला   

वास नि अर्क नसता कोठे, नुसता फेरा गरगर झाला

संसारी नीरस पुळणी फिरत वृथा तू मनभृंगा

लक्ष्मी नृसिंह पदकमलीच्या मकरंदा तू सेवत जा ॥ ३

स्रक्चंदनवनितादीन् विषयान् सुखदान् मत्वा तत्र विहरसे

गंधफलीसदृश ननु तेऽमी भोगान् अन्तरदुःखकृतः स्युः ।

चेतोभृंग भ्रमसि वृथा भवमरुभूमौविरसायाम्

भज भज लक्ष्मीनरसिंहानघपदसरसिजमकरंदम् ॥ ४

मराठी– माळा, चंदन,रमणी इत्यादी गोष्टी आनंददायक आहेत असे समजून त्यात रममाण होतोस. परंतु ते खरोखर प्रियंगुच्या फुलाप्रमाणे मौजमजेनंतर दुःखदायक ठरतात.

बाबी सर रमणी चंदन वा रमसी आनंदी समजुनिया

ते तर साक्षात कारण होती प्रियंगुसम त्रासच द्याया ।

संसारी नीरस पुळणी फिरत वृथा तू मनभृंगा

लक्ष्मी नृसिंह पदकमलीच्या मकरंदा तू सेवत जा

तव हितमेकम् वचनं वक्ष्ये शृणु सुखकामो यदि सततम्

स्वप्ने दृष्टं सकलं हि मृषा जाग्रति च स्मर तद्वदिति ।

चेतोभृंग भ्रमसि वृथा भवमरुभूमौविरसायाम्

भज भज लक्ष्मीनरसिंहानघपदसरसिजमकरंदम् ॥ ५

मराठी– मी तुझ्या फायद्याची एक गोष्ट सांगतो, ती तू ऐक. जर तू शाश्वत सुख इच्छित असशील तर ध्यानात ठेव, स्वप्नात दिसणारे सगळे खोटे असते आणि जागेपणाचेही तसेच (असते).

तुझ्या हिताची गोष्ट सांगतो ऐक सतत जर सौख्य हवे

स्वप्नी सारे दिसते न खरे जागृत दिसणे ही ना बरवे ।

संसारी नीरस पुळणी फिरत वृथा तू मनभृंगा

लक्ष्मी नृसिंह पदकमलीच्या मकरंदा तू सेवत जा

टीप– प्रियंगु ही एक वेल असून ती स्त्रीच्या स्पर्शाने फुलते अशी कविकल्पना आहे. परंतु ज्या स्त्रीच्या स्पर्शाने ती फुलून आली तीच स्त्री त्या वेलीची फुले खुडून तिला दुःखात लोटेल अशी कल्पना मांडली आहे.

********************

— धनंजय बोरकर  (९८३३०७७०९१)
ए १८, वुडलॅंड अपार्टमेंट्स,  गांधी भवन मार्ग,
कोथरूड, पुणे ४११ ०३८

धनंजय मुकुंद बोरकर
About धनंजय मुकुंद बोरकर 60 Articles
व्यवसाय इलेक्ट्रॉनिक (एव्हियॉनिक्स) इंजिनियर. संस्कृत भाषेची आवड. मी केलेले संस्कृत काव्यांचे मराठी गद्य व स्वैर पद्य रूपांतर - १. कविकुलगुरू कालिदासाचे `ऋतुसंहार' (वरदा प्रकाशन, पुणे) २. जयदेवाचे `गीतगोविंद' (प्रसाद प्रकाशन, पुणे). ३. मूकशंकराचार्याचे `मूक पंचशती' ४. जगन्नाथ पंडितांचे `गंगा लहरी' इत्यादी. मी ऋतुसंहार मधील श्लोकांवर आधारित एक दृकश्राव्य कार्यक्रम तयार केला असून त्याचे अनेक कार्यक्रम पुण्यात व इतर ठिकाणीही सादर केले आहेत.

6 Comments on श्रीमत् आदिशंकराचार्यांचे श्रीलक्ष्मीनृसिंहपंचरत्नम् मराठी अर्थासह

  1. खूप छान नेहमीप्रमाणे अनघाताईचे मधुर सुस्पष्ट उच्चारण श्लोक व त्याचा रसमधुर अर्थ
    जय नरहरी जय शामराजा

  2. बिडकर सरांनी नरसिंह सरस्वती पंचरत्नम चे सुंदर भाषांतर केलेले आहे. सहज सोपी भाषा वापरल्यामुळे त्याचा अर्थ कळण्यास मदत होते.
    त्याच श्लोकांचे पद्यात रूपांतर करणे ही अवघड गोष्ट्य ही त्यांनी छान पार पडली आहे
    अशाच त्यांच्या लेखाची भविष्यात त्यांचे कडून अपेक्षा आहेत

  3. अत्यंत तरल,सहज आणि सुंदर असा भावानुवाद आहे.

  4. Happy to read translation..
    Shlok recitation also very clear and musical. Would like to read and listen more… Thanks ????

  5. खूप छान संस्कृत श्लोक व अर्थ ही नामस्मरणाचे महत्व व खर्‍या सुखाची उत्पत्ती कशात आहे ते समजले
    नृसिंह नवराञात खरच मकरंद ठेवा मिळाला

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..