नवीन लेखन...

श्री शिवभुजंग स्तोत्रम् – १९

भवद्गौरवं मल्लघुत्वं विदित्वा
प्रभो रक्ष कारुण्यदृष्ट्यानुगं माम् |
शिवात्मानुभावस्तुतावक्षमोऽहं
स्वशक्त्या कृतं मेऽपराधं क्षमस्व ‖ १९ ‖

भगवंताच्या चरणी शरण जाताना परिपूर्ण शरणागती प्राप्त होण्यासाठी स्वतःच्या अहंकाराचा विलय होणे ही पहिली आवश्यक गोष्ट आहे. त्यासाठी आपल्याजवळ कोणतीही पात्रता नाही याचे वारंवार चिंतन उपयोगी ठरते. अर्थात हे चिंतन हवे. कथन नाही. नाहीतर नुसते म्हणण्यापुरते होईल.
वास्तविक विचार केला तर खरेच आपल्या जवळ कोणतीच योग्यता नाही. आचार्यश्री समान अद्वितीय विभूती जर हे म्हणत असेल तर आपली अवस्था काय? याचा विचारच केलेला बरा.
आचार्य श्री म्हणतात,
हे भगवान शंकरा !
भवद्गौरवं – आपल्या मोठेपणाला, आपल्या विश्वनाथ अवस्थेला, दीनानाथ भूमिकेला,
मल्लघुत्वं – माझ्या अल्प स्वरूपाला, दीनत्वाला,
विदित्वा- जाणून कारुण्यदृष्ट्या- कारुण्यपूर्ण दृष्टीने
अनुगं माम् – आपला अनुयायी असलेल्या माझे,
प्रभो रक्ष – हे प्रभू माझे रक्षण करा.
मी आपला अनुयायी आहे. मी दीन आहे. आपण दीनानाथ आहात. आपल्याशिवाय माझे रक्षण करणार तरी कोण?
शिवात्मानुभाव- हे भगवान शिवशंकरा ! आपण आत्मानुभावी आहात. अर्थात आपल्याला सर्व समजते.
स्तुतावक्षमोऽहं- मी स्तुती करण्यास देखील असमर्थ आहे.
स्वशक्त्या – आपण आपल्या शक्तीने
कृतं मेऽपराधं क्षमस्व – मी केलेल्या अपराधांना क्षमा करा.
मला स्तुती कशी करायची? इतकेही ज्ञान नाही. पण असे असले तरी मला समजो की न समजो , हे भगवंता माझ्यासाठी काय योग्य आहे? हे तुला तर समजते ना?
ते देणे देखील तुझीच शक्ती आहे. मग मी मागण्याची वाट का पाहतोस?

— प्रा. स्वानंद गजानन पुंड 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..