किं यानेन धनेन वाजिकरिभिः प्राप्तेन राज्येन किं
किं वा पुत्रकलत्रमित्रपशुभिर्देहेन गेहेन किम् ।
ज्ञात्वैतत्क्षणभंगुरं सपदि रे त्याज्यं मनो दूरतः
स्वात्मार्थ गुरुवाक्यतो भज भज श्रीपार्वतीवल्लभम् ॥१३॥
आयुष्यामध्ये मिळणाऱ्या सगळ्या गोष्टींपेक्षा भगवान श्री शंकराची कृपा हीच खरी प्राप्ती आहे हे सांगण्यासाठी आचार्यश्री म्हणतात,
किं यानेन – प्रवासाची सुखकारक साधने असून काय?
धनेन – प्रचुर स्वरूपात धन असून काय?
वाजिकरिभिः
प्राप्तेन राज्येन किं – सगळ्या जगावर आपली सत्ता चालेल असे राज्य मिळून देखील काय?
या सगळ्यामध्ये काय? या शब्दाच्या पुढे, उपयोग जी हा शब्द गृहीत आहे.
या सगळ्याच्या प्राप्तीने सुख मिळेल असे माणसाला वाटते. काही काळा पुरते ते सुख मिळते देखील. पण ते टिकाऊ असत नाही. अशा नश्वर सुखाच्या मागे लागणारे लोक, आणखी कशा कशाचा हव्यास करतात? ते सांगताना आचार्य म्हणतात,
किं वा पुत्रकलत्रमित्रपशुभि: – पुत्र संतती, कलत्र म्हणजे पत्नी, मित्र, पशुपक्षी, नवीन संदर्भात लावायचे तर वाहन सौख्य,
देहेन – इतकेच काय तर या सगळ्यांच्या द्वारे मिळणाऱ्या सुखाचा आधार असणारा देह.
गेहेन किम् – विशाल घराचे काय?
ज्ञात्वैतत्क्षणभंगुरं – या सगळ्यांचे क्षणभंगुरतत्व समजून घेऊन,
सपदि रे त्याज्यं मनो दूरतः – हे मना ! या सगळ्यांची आसक्ती दुरूनच, तत्काळ सोडून दे.
स्वात्मार्थ गुरुवाक्यतो भज भज श्रीपार्वतीवल्लभम् – जर तुला स्वतःचे खरंच कल्याण करायचे असेल! तर श्रीगुरूंचा सांगण्यानुसार भगवान पार्वतीवल्लभाचे भजन कर.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply