श्री गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा. श्री स्वामी समर्थांमध्ये या तिन्ही रूपांचा समावेश होतो. खरंतर स्वामींकडे तुम्ही ज्या भावनेने पाहता तेच रूप तुम्हाला त्यांच्यात दिसेल म्हणूनच स्वामींच्या काही मठांमध्ये आपल्याला त्यांची स्त्री देवतेच्या रूपातली आदिशक्ती मूर्ती प्रतिमा दृष्टीस पडते. निदान ते रूप पाहून तरी आपण त्या शक्तीचा आदर केला पाहिजे.
स्वामिं बद्दल काय लिहावे. सारे विश्व व्यापून राहिलेल्या त्या शक्तीला लेखणीत कसे बंदिस्त करावे तरी मी हे धाडस करतेय, अर्थातच त्यांच्याच आज्ञेवरून.
स्वामींची कीर्ती, महती किती वर्णावी. ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’ या शब्दांमध्ये काय जादू आहे याची प्रचिती प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय येऊ शकत नाही. मी अनेक अनुभव घेतलेत. स्वामींचे अस्तित्व निरंतर अवतीभवती जाणवते. संकटात असताना त्यांचा मायेचा स्पर्श मस्तकावर जाणवतो. आनंदात त्यांची मूर्ती हासरी भासते आणि मन निश्चित होते.
स्वामी सारखे गुरु लाभणे म्हणजे आपले अहो भाग्य. स्वामिं बद्दल जे काही वाचन झाले त्यावरून त्यांच्या स्वभावाची कल्पना येते. प्रेमळ, निस्वार्थ, भक्त वत्सल, भक्त कल्याणी व भक्तांच्या हातून चूक घडली तर अत्यंत रोखठोक कडक शब्दात समज देणारे. वरवर त्यांची नजर,चर्या करडी, आक्रमक वाटत असली तरी अंतकरणात मायेचा झरा निरंतर वाहतच असतो. ते जे काही करतात ते आपल्या कल्याणासाठीच ही निष्ठा, श्रद्धा असणे अत्यंत गरजेचे आहे.
स्वामी आपली इच्छा तर पूर्ण करतातच शिवाय आपल्या कर्तव्याची ही जाणीव करून देतात. स्वामी आपल्याला नेहमीच काहीतरी शिकवतात. त्यांनी दिलेल्या ज्ञानाची शिदोरी घेऊनच आपण मार्गक्रमण करावे. असे का, तसे का, कशाला असे निरर्थक प्रश्न मनात आणू नयेत.
स्वामींच्या भेटीला जाताना त्यांच्यासाठी काय न्याव्हे हा प्रश्न नेहमीच पडतो. स्वामींना विशेषता चाफा, गुलाब (लाल) अतिशय प्रिय असावे. कारण त्यांच्या मूर्तीवर एखादा चाफा किंवा गुलाब वाहिले की त्या मूर्तीचे रूप काही वेगळेच भासते अर्थातच त्यासाठी ती नजर असणे आवश्यक आहे. तसा स्वामींच्या मठात जाण्यासाठी वार पहावा लागत नाही परंतु मुख्यत्वे गुरुवारी स्वामींच्या मठात विशेष गर्दी असते. तसेच दत्त जयंती, स्वामींचा प्रकट दिन पुण्यतिथी , या दिवशी मठामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अन्नछत्रे, (भंडारा) असतो. अन्नदान, श्रेष्ठदान ही महाराजांची शिकवणच आहे.आपणही जमेल तसे अन्नदान करावे.
स्वामींना नैवेद्य काय दाखवावा हाही प्रश्न मनाला पडतो स्वामींना चनादारीचे पदार्थ अधिक क्रिया पोळी शेवबुंदी बेसनाचे लाडू म्हैसूर अर्थातच प्रेमाने श्रद्धेने अर्पण केलेले स्वामींना काहीही आवडते हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे
स्वामींना हिना अत्यंत प्रिय आहे त्या सुगंधाने आपलेही मन प्रफुल्लीत होते म्हणूनच स्वामींच्या भेटीला जाताना निर्मळ मनाने जावे एकादी शंका मनात आली तर समिती अचूक टिकतात आणि त्याचे निर्णय तात्काळ करतात स्वामींच्या वस्त्यांवरून हेच लक्षात येते की साधी राहणी उच्च विचार शक्ती अशा तऱ्हेने स्वामींचे हे ब्रह्मस्वरूप समजून घेणे तितके सोपे नाही हे अनंत आहे तुम्ही ते जितके जाणून घेण्याचा प्रयत्न करा तेवढे नव्या नव्या रूपाने ते तुमच्या समोर येईल हा प्रवास असाच निरंतर सुरू राहावा आयुष्यात त्यांच्या चरणी त्याच्या सेवेत जावे जीवनाचे सार्थक व्हावे ही सदिच्छा
Leave a Reply