स्फुरत्कुण्डलामृष्टगण्डस्थलान्तम्
जपारागचॊराधरं चारुहासम् ।
कलिव्याकुलामॊदिमन्दारमालम्
महॊरस्फुरत्कौस्तुभॊदारहारम् ॥ ६ ॥
भगवंताच्या विश्व मनोहर मुखकमलाचे वर्णन करीत असताना आचार्य श्री पुढे म्हणतात,
स्फुरत्कुण्डलामृष्टगण्डस्थलान्तम् – भगवंतांनी कानात धारण केलेल्या कुंडलांच्या प्रभेने त्यांचे कपोल प्रदेश उजळून निघालेली आहेत.
गाल डोळा आणि कान त्यांच्यामध्ये असणाऱ्या उंचवट्याला कपोल असे म्हणतात. भगवान श्रीविष्णु कानामध्ये जी मकर कुंडले धारण करतात त्यांच्यात अनेक स्वर्गीय रत्ने जडवलेली आहेत. ज्या वेळी त्यावर प्रकाश पडतो त्यावेळी त्यातून जो रत्न प्रकाश बाहेर पडतो तोच बाबा विकत सगळ्यात जवळ असलेल्या या उंचवट्यावर परावर्तित होतो.
त्या तेजाने भगवंताची कपोल अधिकच तेजस्वी दिसत आहेत. ही कल्पना हे दृश्य किती रमणीय आहे.
जपारागचॊराधरं – जपा पुष्प म्हणजे जास्वंद. त्याचा राग म्हणजे रंग. तो रंग चोरणारा म्हणजे हरण करणारा, त्याचे सौंदर्य नष्ट करणारा, असा भगवंताचा अधरोष्ठ आहे.
जास्वंदाच्या रंगामध्ये एक ओले, आकर्षक, चमकदार स्वरूप आहे. तो सर्व भाव येथे गृहीत आहे.
चारुहासम् – भगवंताचे हास्य अत्यंत चारू म्हणजे आकर्षक, सौंदर्यसंपन्न असे आहे.
अलिव्याकुलामॊदिमन्दारमालम् – अली म्हणजे भुंगा. त्या भुंग्यांनी व्याकूळ असलेली अर्थात अनेक भुंगे सतत भ्रमण करत असल्याने त्यांच्याद्वारे जणुकाही सतावली गेलेली, त्रस्त झालेली. त्या सगळ्यांना मोद म्हणजे आनंद देणारी. त्याचप्रमाणे पाहणाऱ्यांना देखील आनंद देणारी.
मंदार म्हणजे स्वर्गीय पुष्पांची माळ, तसेच
महॊरस्फुरत्कौस्तुभॊदारहारम्- त्याचप्रमाणे कौस्तुभ रत्नांने युक्त असणार्या विशाल मौक्तिकमालेने ज्यांचे वक्षस्थळ सुशोभित आहे,
अशा भगवान श्री विष्णूंना मी वंदन करतो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply