विश्वत्राणैकदीक्षास्तदनुगुणगुणक्षत्रनिर्माणदक्षाः
कर्तारो दुर्निरूपाः स्फुटगुरुयशसां कर्मणामद्भुतानाम् ।
शार्ङ्गं बाणं कृपाणं फलकमरिगदे पद्मशंखौ सहस्रं
बिभ्राणः शस्त्रजालं मम ददतु हरे: बाहवो मोहहानिम् ॥३३॥
भगवान श्रीविष्णूंना सहस्रबाहू असे म्हटले जाते. सामान्य अवस्थेत जरी भगवान चतुर्भुज दिसत असलेले तरी आवश्यकतेनुसार ते आपल्या हजारो हातांना प्रगट करतात. त्यावेळी ते आपल्या हातात अनेक आयुधे धारण करतात. त्या सगळ्यांच्या सह भगवंताच्या बाहूंचे वैभव आचार्यश्रींनी या श्लोकाचा स्पष्ट केले आहे.
विश्वत्राणैकदीक्षास्तदनुगुणगुणक्षत्रनिर्माणदक्षाः – सगळ्या विश्वाचे रक्षण करण्याची जणु काही त्या हातांनी दीक्षाच घेतली आहे. तशीच दीक्षा घेणार आहे, त्याच्या गुणांचे अनुसरण करणारे क्षत्रिय भगवंताच्या त्याच बाहू पासून निर्माण होतात.
कर्तारो – संपूर्ण विश्वाचे पालन करणाऱ्या,
दुर्निरूपाः – ज्यांच्या स्वरूपाचे वर्णन करणे अत्यंत कठीण आहे अशा,
स्फुटगुरुयशसां – अत्यंत श्रेष्ठ यशाने संपन्न असणाऱ्या, कर्मणामद्भुतानाम् – अद्भुत प्रकारचे कर्म करणाऱ्या,
शार्ङ्गं – शार्ङ नावाचा धनुष्याला धारण करणाऱ्या,
बाणं – विविध प्रकारचे बाण,कृपाणं – तलवार, फलकम् – ढाल अरि – चक्र, गदे- गदा पद्मशंखौ – कमळ तथा शंख अशा विविध वस्तूंना धारण करणारे,
सहस्रं बिभ्राणः शस्त्रजालं – हजारो प्रकारच्या शस्त्रांना लीलया सांभाळणारे,
मम ददतु हरे: बाहवो मोहहानिम् – भगवान श्रीहरींचे ते दिव्य बाहू माझ्या मोहाला नष्ट करणारे ठरोत
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply