भ्रान्त्वा भ्रान्त्वा यदन्तस्त्रिभुवनगुरुरप्यब्दकोटीरनेका:
गन्तुं नान्तं समर्थो भ्रमर इव पुनर्नाभिनालीकनालात् ।
उन्मज्जन्नूर्जितश्रीस्त्रिभुवनमपरं निर्ममे तत्सदृक्षं
देहांभोधिः स देयान्निरवधिरमृतं दैत्यविद्वेषि विष्णोः ॥४८॥
भगवान श्रीविष्णूच्या अपार देह वैभवाचे वर्णन तेथे आचार्य श्री आपल्या विशिष्ट शैलीत सादर करीत आहेत.
त्यासाठी त्यांनी एक कल्पना आधारभूत मानलेली आहे. ती कल्पना म्हणजे एकदा भगवान विष्णू चा नाभीतून उत्पन्न कमला वर बसलेल्या भगवान ब्रह्मदेवांना श्रीहरीच्या स्वरूपाचे सर्वांगपरिपूर्ण दर्शन घेण्याची इच्छा झाली. त्यासाठी त्या कमळाच देठातून ते भगवंताच्या आत शिरले. मात्र त्यांना आलेल्या अपयशाच्या वर्णनातून आचार्य श्री भगवंताच्या अपार यशाचे वर्णन करीत आहेत.
ते म्हणतात,
भ्रान्त्वा भ्रान्त्वा यदन्तस्त्रिभुवनगुरुरप्यब्दकोटीरनेका: – या त्रिभुवनाचे पालक असणार्या भगवंताच्या मर्यादेचा विचार करीत हजारो कोटी वर्ष फिरल्यानंतर सुद्धा,
गन्तुं नान्तं समर्थो भ्रमर इव पुनर्नाभिनालीकनालात् – त्याचा पार लावण्यास असमर्थ ठरलेले ब्रह्मदेव एखाद्या भुंग्या प्रमाणे आपले निवासस्थान असणाऱ्या त्याच आपल्या कमळात येऊन शांत बसले.
उन्मज्जन्नूर्जितश्रीस्त्रिभुवनमपरं निर्ममे तत्सदृक्षं – त्यानंतर त्यांनी केलेल्या तपश्चर्येमुळे त्यांना झालेल्या कृपेने त्यांनी आत पहिलेल्या संसारा प्रमाणे या ब्रम्हांडाची रचना केली.
देहांभोधिः स देयान्निरवधिरमृतं दैत्यविद्वेषि विष्णोः – त्या दैत्य शत्रू असणाऱ्या भगवान विष्णूंचे ते अपार सागराप्रमाणे असणारे सगुणरूप आम्हाला निरंतर अमृत प्रदान करो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply