पश्यञ्शुद्धोऽप्यक्षर एको गुणभेदो
न्नानाकारान्स्फाटिकवद्भाति विचित्रः।
भिन्नश्छिन्नश्चायमजः कर्मफलैर्य
स्तं संसारध्वान्तविनाशं हरिमीडे।।१७।।
परब्रह्म परमात्मस्वरूप असणाऱ्या भगवंताच्या दिव्यत्वाचे वैभव वर्णन करताना आचार्य श्री वेगवेगळ्या अंगाने आपल्याला भासमान असणाऱ्या संपूर्ण विश्व पेक्षा त्याचे स्वरूप कसे वेगळे आहे ते उलगडून दाखवत आहेत.
प्रस्तुत श्लोकात आचार्यश्री म्हणतात,
पश्यन् – द्रष्टा असणाऱ्या या परमात्म चैतन्याला पहा. समजून घे.
शुद्धो – ते परम शुद्ध चैतन्य आहे.
त्यामध्ये मायेचा गुणांचा कोणताही लवलेश नाही.
अप्यक्षर – ते तत्वा अक्षर असून देखील,
या सांगण्यातच आचार्य सुचवत आहेत की मुळात ते तत्व अक्षरच आहे. पण तरी ते आपल्याला क्षर जाणवते. मुळात ते निर्गुण-निराकार आहे.
आपल्याला सगुण-साकार जाणवते. याचा अर्थ होणारी जाणीव आपल्याकडून आहे त्याच्याकडून नाही.
एको गुणभेदो
न्नानाकारान् – ते एकच तत्व गुणांच्या भेदानुसार वेगवेगळे भासते.
मात्र हे जाणवणारे वेगळेपण गुणांच्या सापेक्ष आहे.
तो परमात्मा सत्वगुणी सज्जनांना प्रमुख कृपाळू वाटतो. तोच तमोगुणी राक्षसांना शत्रू वाटतो. तो ना कोणाचा मित्र आहे ना शत्रू. समोरच्याच्या वृत्ती नुसार तो बदलतो.
याबदलाची वास्तविकता स्पष्ट करण्यासाठी आचार्य उदाहरण देताना म्हणतात,
स्फाटिकवद्भाति विचित्रः – तो स्फटिका समान वेगवेगळ्या रंगाचा भासतो.
स्फटिकावर ज्यारंगाचा प्रकाश झोत सोडला जाईल त्या रंगाने स्फटिक चमकतो. तसा समोरच्याच्या गुणांनुसार परमात्मा आपला रंग बदलतो.
ज्यावेळी कोणत्याच गुणाचा संबंध नसतो यावेळी बाहेरच्या प्रकाश शिवाय स्फटिकाचे असणारे स्वच्छ स्वरूप हे परमात्मा हे निर्गुण निराकार रूप आहे.
भिन्नश्छिन्नश्चायमजः कर्मफलैर्य – आपल्या कर्मानुसार जो अज असूनही या संसारात वेगवेगळा आणि मर्यादित वाटतो,
स्तं संसारध्वान्तविनाशं हरिमीडे – त्या संसार रुपी अंधकाराचा विनाश करणाऱ्या भगवान श्री विष्णूंचे मी स्तवन करतो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply