यस्यैकांशादित्थमशेषं जगदेत
त्प्रादुर्भूतं येन पिनद्धं पुनरित्थम्।
येन व्याप्तं येन विबुद्धं सुखदुःखै
स्तं संसारध्वान्तविनाशं हरिमीडे।।२।।
या अनंत कोटी ब्रह्मांडांच्या निर्मिती स्थिती आणि लयाचे कारण असणाऱ्या परब्रह्म परमात्मा स्वरूप भगवान श्रीविष्णूंच्या त्या सकल संचालक स्वरूपाचे वर्णन करताना भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात,
यस्यैकांशादित्थमशेषं जगदेत
त्प्रादुर्भूतं – ज्यांच्या एका असा तून हे संपूर्ण जग उत्पन्न झालेले आहे.
हा विचार व्यवस्थित समजून घ्यायला हवा. कोणत्याही देवतेचे मूळ स्वरूप ओंकार ब्रह्म आहे. त्यामध्ये अ,उ आणि म अशा तीन मात्रा आहेत. या तीन गुणांच्या प्रतिनिधी आहेत.
निर्मिती हा रजोगुणाचा विषय आहेत. त्यामुळे त्याला एका अंशाचा विषय म्हटले.
यातील दुसरा अर्थ असा असतो की हे संपूर्ण विश्व भगवंताच्या एका अंशातून निर्माण झाले. याचा अर्थ भगवंताचे स्वरूप या पेक्षा कितीतरी व्यापक आहे.
तो भाव येथे सूचित करायचा आहे.
येन पिनद्धं पुनरित्थम्- निर्माण झालेले हे संपूर्ण विश्व आपल्या द्वारे गुंफलेले आहे. अर्थात या सर्व विश्वाच्या संचालनाची सूत्रे त्यांच्या हातात आहेत.
येन व्याप्तं – ज्यांनी या संपूर्ण विश्वाला व्यापले आहे. अर्थात या विश्वातील कणाकणांमध्ये तेच चैतन्य विलास करीत आहे.
येन विबुद्धं सुखदुःखै – ज्यांनी या जगाला सुखा आणि दुःखाच्या अनुभवांना घेता येईल असे बनवले आहे. अर्थात या विश्वास या दोन्ही अनुभवांना स्वीकारण्याचे विविध उपाय निर्माण केलेली आहे.
स्तं संसारध्वान्तविनाशं हरिमीडे – त्या संसाररूपी अंध:काराचा विध्वंस करणाऱ्या श्रीहरीचे मी स्तवन करतो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply