श्रीमंत योगी, जाणता राजा,
श्री शिवछत्रपतींना त्रिवार वंदन,-
श्रीशिवराय छत्रपती,अजून आठवती,लोक पहा आजमिती,–
होsssss जीssss जीssssजी,
रयतेस अभय’ तरी दरारा,
परस्त्री’ माता, आपुल्या मातेचा आदर करती होssss जीsss जी,
आज्ञेत राहून तिच्या, सकल कारभार केला,राज्यात पहा,
सर्वधर्मसमभाव’ पाहती होssss
जीssss जीssssजी,-++
छत्तीस वर्षे गनिमाशी झुंजला,
जातिभेद झुगारुन एकोपा साधला,
शक्ती,युक्ती,नीती,रीती,भक्ती होssssजीsss जीsss जी,-++
दगडधोंड्यात जागवली अस्मिता
स्वराज्यहेतू कृतीने योजिला,
महाराष्ट्रधर्म’ वाढवला की होsss
जीsssssजीsssजी,—++
शब्द आईचा पाळला,राज्य मानुनी
श्रींची इच्छा,; साठी सत्ता स्थापिली
होssssजीssssजीssssजी,-++
राज्यकार्यी जीव वाहिला,समर्पित जीवना,संकटे किती झेलली,sss होsssजीsssजीssssजी,-++
प्रजेस पित्यासम,न्यायास नेहमी तडी, तरून गेला,कित्येकदा,तो धर्मसंकटी,होsssजीsssजी,-++
वासनांधांना नव्हती क्षमा,
सजा कठोर पापकर्मा,
सेवा, मदतीचा हात मिळतां,
ओघ भरघोस दानाचाच वाही,होsss जीsssजीsssजी-+
जीर्णोद्धार मंदिरांचा, मान मशिदींचा,ज्ञानादरे कलाकारही पूजी, होsssजीsssजीsssजी,-+
कदर विद्या कलांची, प्राधान्य त्या कामा, कलेपुढे हमेशा नमला,असा रत्नपारखी, होsss जीssssजीsssजी,-+
मातब्बर’ शत्रूंना चकवा,साधुनी गनिमी कावा,एकनिष्ठांना प्रेमदायी होsssजीsssजीsss,-+
फितुराची गय’ न केली,विवेकाने गड,किल्ले राखतां,महाराष्ट्र् अजिंक्य ठेवी, होsssजीsssजी,–++
राजा सदोदित झुकला,संतांच्या बोला,मान दिला सत्यता,करुणा शांती होsssजीsssजीsssजी,-+
कधी माघार घेऊनी,राजकारण खेळला,मानुनी बुद्धिवंतांचा सल्ला,
गरिबांत गरीब समाधानी त्याच्या दारी होsss जीsssजीsss,जी,-+
आरमार’ निर्मुनी जगाला,नवा दृष्टिकोन दिधला,नव्या कल्पना,नव्या जाणिवा,नाविन्याचा आधार होई, हो,ssssजीsssजीsssजी,-+
तरीही धाकापुढे त्याच्या,फिरंगी’ही नमला,मनांत धास्तावला,वचक त्याचा पाहुनी, होsssजीsssजीsssजी,-++
© हिमगौरी कर्वे.
Leave a Reply