श्रीरामा, घन:श्यामा,sssss—घनघोर या काननी,
किती पुकारु तुमच्या नावा,ssss-
लक्ष्मण भावजी गेले सोडुनी,–!!! .
अयोध्येस परतल्यावरी,
बसले मी राणीपदी,
आदर्श जोडप्याचा मान देऊनी जनतेने केले धन्य जीवनी,–
त्यातच आणखी गोड बातमी,
स्वर्गच दोन बोटे राहिला,–!!!
कुणाची नजर लागली,
ग्रहस्थिती विपरीत फिरली,
तुम्ही का सोडले मज रानी,
जावे कुठे एकाकी मी आता,–!!!
मनोरथे सगळी संपली तुमची सेवा मनी राहिली,
असे काय घडले सांगा तरी,
काय चुकले माझे, पुरुषोत्तमा–!!!
या रानीवनी मी एकटी,
काट्यांत कोवळी कळी, हिंडताना– भरकटलेली,
या भयानक अरण्यी,
नाही मज कुणीच त्राता,–!!!
कुळाचा आपुल्या वंश पोटी,–
जीव वाढे, माझिया ओटी,–
पतीने पण सोडल्यावरी,–
काय सांगू त्या लेकराला,-!!!
उद्ध्वस्त सीता, उध्वस्त जानकी उध्वस्तताच या तिन्ही लोकी,
कुठले राज्य कुठला पती,
अर्थच जीवनात न राहिला,–!!!
हिमगौरी कर्वे©
Leave a Reply