स्तुती मी देवा करुं कुणाची
चित्र बनविले अतिशय सुंदर
सौदर्य वाटते लोभसवाणे
खिळून राहते जेथे नजर
तू तर असशील कलाकार तो
ह्या विश्वाचा कर्ता महान
जिवंत चित्र जे एक बनविले
दाद तयाची देईल कोण ?
जमता चित्र अतिशय रेखीव
मनास घेई मोहून ते
ह्यात चित्राची आपती किमया
मला न कांही दिसून येते
कला पुजारी रसीक मीच तो
सौंदर्य टिपती माझे नयन
मुल्यमापन ते अचुक
करिती कलाकार, कला, रसिक ह्यातून
परि मी तरी आहे कोण खरा
नसा नसा ह्या सौंदर्य टिपती
कला तुझी आणि दृष्टी तूझी
तुझेच सारे माझ्यांत असती
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@gmail.com
विवीध-अंगी *** ८
दैवी संपत्तीचे २६ गुणरुप-
१-अभय २-सत्वशुद्धी ३-ज्ञानयोग व्यवस्थिती ४-दान ५-दम ६-यज्ञ ७-स्वाध्याय
८- तप ९-आर्जव १०-अहिसा ११-सत्य १२-अक्रोध १३-त्याग १४-शांती १५-अपैशून्य
१६-दया १७-अलौलुप्य १८-मार्दव १९-लाज २०-अचापल्य २१तेज २२-क्षमा
२३-धर्य २४-शौच्य २५-अद्रोहत्व २६-अमानित्व
विरुद्ध-आसुरी संपत्ती-१- दंभ २-दर्प ३-अभिमान ४-क्रोध ५-पारुष्य ६-अज्ञान
Leave a Reply