![31925](https://www.marathisrushti.com/articles/wp-content/uploads/sites/3/2014/12/31925.jpeg)
वांद्रे पूर्व हा तसा गर्दी आणि दाटीवाटीच्या वस्तीमुळे गजबजलेला भाग. कारण याच भागात महत्वाची कार्यालयं, कमर्शियल कॉम्प्लेक्स आणि न्यायालय वसली आहेत. या अति महत्वपूर्ण ठिकाणांपैकी आपण कुठेही जाणार असाल किंवा पूर्वेला जर काही कामा निमित्त आले असाल तर इथल्या गणेश मंदिराला अवश्य भेट द्या; वांद्रे पूर्वेला उतरल्यावर उजवीकडच्या सरळ रस्त्याने चालत आल्यावर तुम्हाला काही अंतरावरच “श्री गणेश व दक्षिणमुखी हनुमान” तसंच शनिदेवतांच, मंदिर” दिसेल. मंदिराचं द्वार दक्षिणमुखी असल्यानं येथे दक्षिणमुखी हनुमानाची व शेजारीच शनीच्या मूर्तीचं दर्शन होतं.
![](/imagesarticle/31925/behram_ganesh_721586756641045.jpg)
दक्षिण मुखी हनुमानाची मंदिरं तशी कमीच पहायला मिळतात, याचं वैशिष्ट्य म्हणजे सर्व संकटांचं निवारण करुन सुस्थिती स्थापन करणं, रामायणातील अख्यायिकेनुसार लक्ष्मणाचे प्राण वाचवण्यासाठी हनुमानाने दक्षिण भारतातून हिमालयाकडे कूच करुन संजीवनी वनस्पती मिळवली होती; त्याचा संदर्भ येथे अधोरेखीत होतो, व बुधवारी दक्षिणमुखी हनुमानाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते.
या देऊळाच्या प्रवेश द्वारातच पिंपळ, वट व औदुंबर या झाडांचा “त्रिवृक्ष संगम” पाहवयास मिळतो. या ठिकणी दत्ताची मूर्ती व पादुकांची स्थापना करण्यात आली आहे.
![](/imagesarticle/31925/hanuman_829296341398731.jpg)
या मंदिरानी सामाजिक बांधिलकी राखत गरीब विद्यार्थ्यांना शालेय वस्तुंचं वाटप करण्यात येते, आर्थिक दृष्ट्या असक्षम असलेल्या व्यक्तींनाही ठराविक रकमेपर्यंत मदत करण्यात आली आहे.
२००५ साली या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. सामाजिक, धार्मिक परंपरेनी पूर्ण बेहराम पाड्याचं श्री गणपती मंदीर वांद्रेकरांसाठी, व येथील कार्यालयातील कर्मचार्यांसाठी ही महत्वाचं श्रद्धास्थान म्हणता येईल.
— सागर मालाडकर
Leave a Reply