नवीन लेखन...

“बेहराम पाड्यातील श्री गणेश व दक्षिणमुखी हनुमान मंदीर”


वांद्रे पूर्व हा तसा गर्दी आणि दाटीवाटीच्या वस्तीमुळे गजबजलेला भाग. कारण याच भागात महत्वाची कार्यालयं, कमर्शियल कॉम्प्लेक्स आणि न्यायालय वसली आहेत. या अति महत्वपूर्ण ठिकाणांपैकी आपण कुठेही जाणार असाल किंवा पूर्वेला जर काही कामा निमित्त आले असाल तर इथल्या गणेश मंदिराला अवश्य भेट द्या; वांद्रे पूर्वेला उतरल्यावर उजवीकडच्या सरळ रस्त्याने चालत आल्यावर तुम्हाला काही अंतरावरच “श्री गणेश व दक्षिणमुखी हनुमान” तसंच शनिदेवतांच, मंदिर” दिसेल. मंदिराचं द्वार दक्षिणमुखी असल्यानं येथे दक्षिणमुखी हनुमानाची व शेजारीच शनीच्या मूर्तीचं दर्शन होतं.

मंदिराच्या मुख्य भागात गणपतीची सुबक मूर्ती असून तिची प्रतिष्ठापना १९८९ मध्ये मंदिर उभारणीच्या वेळेत करण्यात आली होती. त्यापूर्वी अर्थात, देऊळ उभारण्या अगोदर रस्त्यांच्या कडेलगत छोटेखानी देव्हार्‍यात गणपतीची मूर्ती होती; त्यामूर्तीचं रितसर विसर्जन करुन त्याजागेवर मंदिराची पायाभरणी करण्यात आली असल्याचं देऊळाचे ट्रस्टी सांगतात.
दक्षिण मुखी हनुमानाची मंदिरं तशी कमीच पहायला मिळतात, याचं वैशिष्ट्य म्हणजे सर्व संकटांचं निवारण करुन सुस्थिती स्थापन करणं, रामायणातील अख्यायिकेनुसार लक्ष्मणाचे प्राण वाचवण्यासाठी हनुमानाने दक्षिण भारतातून हिमालयाकडे कूच करुन संजीवनी वनस्पती मिळवली होती; त्याचा संदर्भ येथे अधोरेखीत होतो, व बुधवारी दक्षिणमुखी हनुमानाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते.
या देऊळाच्या प्रवेश द्वारातच पिंपळ, वट व औदुंबर या झाडांचा “त्रिवृक्ष संगम” पाहवयास मिळतो. या ठिकणी दत्ताची मूर्ती व पादुकांची स्थापना करण्यात आली आहे.
परंपरे प्रमाणे सकाळच्या प्रहरी व संध्याकाळी येथे आरती तर होतेच. पण भजनं, किर्तनं ही होत असतात. त्याचप्रमाणे गणेश जयंती, गणेशोत्सव, संकष्टी चतुर्थी, विनायकी, व अंगारकीला सुद्धा भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळते.
या मंदिरानी सामाजिक बांधिलकी राखत गरीब विद्यार्थ्यांना शालेय वस्तुंचं वाटप करण्यात येते, आर्थिक दृष्ट्या असक्षम असलेल्या व्यक्तींनाही ठराविक रकमेपर्यंत मदत करण्यात आली आहे.
२००५ साली या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. सामाजिक, धार्मिक परंपरेनी पूर्ण बेहराम पाड्याचं श्री गणपती मंदीर वांद्रेकरांसाठी, व येथील कार्यालयातील कर्मचार्‍यांसाठी ही महत्वाचं श्रद्धास्थान म्हणता येईल.

— सागर मालाडकर

Avatar
About सागर मालाडकर 111 Articles
श्री. सागर मालाडकर हे आकाशवाणीवरील निवेदक असून ते मराठीसृष्टीसाठी नियमितपणे लेखन करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..