नवीन लेखन...

श्री. जगन्नाथ पाठक ।। सद्गुरुमाऊली जगन्मित्र ।।

सप्टेंबर २०१९ महिन्याचा गुरुतत्त्व विशेषांक दत्तमहाराजांची कर्मभूमी असलेल्या श्री क्षेत्र गाणगापूर स्थित जय गुरुदेव आश्रम ट्रस्टचे संस्थापक ब्रह्मलीन परमपूज्य जगन्नाथ चिंतामण पाठक गुरुजी यांच्या जीवनावर आधारित आहे.

“भक्तकामकल्पदुम” श्रीमद्गुरुचारत्र” हा पाचवा वेद म्हणून मानल्या गेलेल्या परमाण प्रासादिक अलैकिक ग्रंथाची इ. स. १९५४ सालापासून गेली ६० वर्षे सातत्याने शेकड पारायणे करुन त्याद्वारे “ग्रंथ हेच गुरु” हे तत्त्व आपल्या आचार-विचार- उच्चारांनी सिध्द करणारे तसेच श्रीगुरुचरित्र ग्रंथात सांगितलेली वैदिक साधना अंगीकृत करुन श्रीगुरु नृसिंहसरस्वती महाराजांशी तादाम्य पावून समर्पितवृत्तीने अलौकिक शांत जीवन जगणारे शांत प्रेमळ व्यक्तिमत्त्व म्हणजे श्री पाठक गुरुजी.

कडक शिस्तीच्या पोलिस खात्यात सुमारे चार दशके नोकरी करत असतानाही दत्तभक्तीच्या पाऊलवाटेवर आपले संपूर्ण जीवन तन्मयतेने समर्पित करणारी परमश्रध्दाळू गुरूकृपांकित व्यक्ती म्हणजे पाठक गुरुजी पूर्वी होते महत्त्व । ब्राह्मणांसी देवत्त्व । वेदबळे नित्यत्त्व । भुसूर म्हणती त्या काजा । श्रीगुरुचरित्र अध्याय २६.२४ या ओवीची आजही सत्यता पटवून देणारे भुदेव म्हणजे परमपूज्य पाठक गुरुजी. संसारात राहूनहीप्रयत्नपूर्वक परमेश्वराची कृपा प्राप्त करून घेता येते याचे स्वानुभूवात्मक उदाहरण म्हणजे पाठक गुरुजी.

आपल्या सर्वाच्या सहवासात राहून त्यागी, निस्वार्थी भावनेने वर्तन करीत नि:स्यीम उपासना करून झालेल्या ईश्वरी प्रेरणेने पवित्रतेची दैवी स्पंदने देऊ शकणारे नवे एकांतमय उपासना स्थान निर्माण करून त्या स्थानात वास्तव्य करणाऱ्याला निरपेक्ष ईश्वरीप्रेमाचे संस्कार मिळावेत एखादी “श्रीगुरुकृपा” महात्म्य प्राप्त केलेले महान “जगन्मित्र” म्हणजे आदरणीय पाठक गुरुजी.

मुक्काम पोस्ट नांदेड तालुका: धरणगाव, जिल्हा: महाराष्ट्र येथील श्रीराममंदिराचे मुख्य पुजार श्री. चिंतामण आत्माराम पाठक यांचे ज्येष्ठ सुपुत्र पिढ्यानपिढ्या “श्रीराम” उपासक “पाठक” या ब्राह्मण घराण्यात श्रीदत्तमहाराजांना केलेल्या नवसामुळे पाठकगुरुजींचा जन्म झाला. बालपणापासूनच आई- वडिलांच्या धार्मिक स्कारांमुळे गुरुसेवा आणि ईश्वरभक्ती मनावर बिंबली गेली. घरच्या श्रीराममंदिरापासून सुरू झालेला अध्यात्माचा श्रीगणेशा, शिक्षणोत्तर पितृआज्ञा प्रमाण मानून केलेल्या विवाहानंतर दत्तभक्तीकडे वळला. श्रीगुरुचरित्र या परमप्रासादिक ग्रंथाची पारायणसेवा हीच लौकिक उनत्तीची आणि आपल्या अलौकिक उध्दाराची गुरुकिल्ली आहे याबद्दल अनुभूतीपूर्वक मनाची खात्री पटली. गुरुजींबद्दल त्यांच्या आईने मनी बाळगलेली नोकरी करण्याची इच्छा आणि वडिलांनी अपेक्षिलेली नोकरी करण्याची आणि वडिलांनी अपेक्षिलेली भिक्षुकी या दोन्ही इच्छांना यथोचित मान देऊन गुरुजींनी आपल्या चार दशकांच्या नोकरीच्या कालखंडात नोकरी आणि भिक्षुकी यांचा योग्य समतोल राखत दत्तभक्ती वृध्दिंगत केली. पहाटे तीन ते रात्री १२ वाजेपर्यतच्या आपल्या व्यस्त लौकिक दिनचर्येतून स्वतःसाठी मिळालेला फावला वेळ गुरुजींनी श्रीगुरुचरित्र पारायणसेवा करीत सत्कारणी लावलो. प्रथमतः नोकरीतील भ्रमंती, देवदर्शनासाठी तीर्थाटन आणि सेवानिवृत्तीनंतर ईश्वरी इच्छेने सोपवलेल्या दत्तकार्यासाठी “गगनभरारी” ही गुरुजींनी “अनवाणी” पायांनी केली. धर्मपत्नी माईंच्या गृहकृत्य दक्षपणामुळेच जगाचा संसार सांभाळणाऱ्या गुरुजींचा प्रपंच परमार्थरूप झाला.

शंभरहून अधिक गायत्री पुरश्चरणे आणि अखंड श्रीगुरुचरित्र पारायणसेवा आपल्या आयुष्यात करणारे परमपूज्य गुरुनाथबाबा दंडवते हे गुरुजींना सद्गुरु म्हणून लाभले आणि बद्रीनाथ या प्राचीन तीर्थक्षेत्री गुरुजींना दंडवतेबाबांकडून गुरुमंत्र मिळाला. गुरुमंत्राच्या अखंड अनुसंधानाने पारायणसेवेमुळे आणि अंगकृत केलेल्या गायत्री उपासनेमुळे ईश्वरी सत्य कळण्याचे भाग्य गुरुजींना लाभले. प्रयत्नांती परमेश्वर !

निवृत्तीनंतर दत्तभक्तीतच रममाण झालेल्या या पाठक दांपत्यांच्या घरात अक्षरक्षः स्वर्ग अवतरला. पूर्वसुकृतामुळे आणि ईश्वरकृपेने कित्येकांना गुरुजींच्या सत्संगतीचा परमलाभ झाला आणि त्यांच्या श्रध्दाशील हृदयांत दत्तभक्तीची चैतन्यमयी पाऊले उमटली.
जयासी प्रसन्न होय गरु । तयाचे घरी कल्पतरु । चिंतिले फळ देतसे ।।
श्रीमद गुरुचरित्र अध्याय ४६.४१

याचे सवौत्कृष्ट उदाहरण म्हणजे शारिरीक अपंगत्त्वामुळे शाळेची पायरीही न चढलेल्या श्री. महेश मनोहर पाटील यांनी पाठकगुरुजींच्या आशीर्वादामुळे संपूर्ण गुरुचरित्र ग्रंथ “हस्तलिखित केला! याचा प्रत्यय ज्यांनी घेतला ते खरोखरच भाग्यवान ! ही दत्तकृपेची अनुभूती गुरुजींच्या माध्यमातून दत्तदर्शनासाठी येणाऱ्या कित्येक दत्तभक्तांच्या जीवनांतही पाझरली आणि जय गुरुदेव भक्तपरिवाराचा उदय झाला. माहीम येथील स्वगृही मग दर गुरुवारी दत्तदरबार भरू लागला.

ईश्वर डोळयांना दिसत नाही पण त्यांची ईशकार्यातून अनुभूती येते. गुरुजींची दत्तभक्तीची इमारत फळाला आली. आणि श्रीदत्तमहाराजांच्या प्रेरणेने श्री क्षेत्र गाणगापूर या त्यांच्याच युगानुयुगे असलेल्या सिध्दभूमीत दत्तभक्तांना श्रीगुरुचरित्र या दत्त सांप्रदायिक प्रमाणग्रंथाची पारायणसेवा अल्प खर्चात करणे सूकर व्हावे या उदात्त हेतूने खिशात कोणतीही आर्थिक बचत नसतानाही “श्रीगुरुदेवनिवास” या वास्तूची निर्मिती झाली.

ऐक शिष्या नामकरणी । तू गुरुभक्ती शिरोमणी ।
तुझी भक्ति श्रीगुरुचरणी । लीन होय निर्धारी ।।

“निमित्त माझे करूनि लीला श्रीदत्तगुरु करिती” अशी मनाची नामधारकाप्रमाणे संपूर्ण शरणागत अवस्था ठेवून दैनंदिन लौकिक व्यवहार श्री दत्तमहाराजांच्याच इच्छेने आणि कृपाशीर्वादामुळे होत आहेत. असा भक्तीचा आदर्श लोकांसमोर ठेवणारे गुरुजी प्रसिध्दीपासून नेहमच पराडमुख राहिले. “मी चालत नाही, मला भगवंत चालवतो!” “मी दत्ताचा आहे आणि माझ्याकडून होणारे प्रत्येक कार्य हे श्रीदत्तमहाराजांचे आहे” अशी प्रबळ जीवननिष्ठा अंगी बाळगून, येणारा

प्रत्येक क्षण, घडणारी प्रत्येक घटणा आणि दारात येणाऱ्या व्यक्तीचे आगमन श्रीदत्तमहाराजांच्या संकेतानुसारच आहे असा साक्षीभाव मनी बाळून त्याला यथोचित न्याय गुरुजी देत. “मज आवडे अथवा न आवडों । “तु” जे इच्छिसी तेंचि घडो । हे मागण्या अवघडों, जीभ माझी ! असे गुरुजी प्रार्थनेतही म्हणत.

सद्गुरु दंडवतेबाबा गुरुजींना “जगन्मित्र” या नामाभिधानाने संबोधले. जग आणि मित्र दोन्ही शब्दांचा अर्थ व्यापक सखोल आहे. जगाचा मित्र तो जगन्मित्र ! वसुधैव कुटंबकम् या न्यायाने पाहात आपल्या प्रेमळ, संवेदनशील मनाने त्यांच्या लॉकेक – अलौकिक प्रश्नांना कवेत घेत, करुणामय वात्सल्याने त्यांना दत्तभक्तीकडे वळवला. “महाराज सांभाळतील” असे संबोधून जणू भक्तांच्या क्षेमकल्याणाची ग्वाही देणाऱ्या या “जगन्मित्राला” कोटी कोटी प्रणाम.

भक्तगणांना तारणारा हा भूदेवच ! ज्यांच्या मनाचे निवासस्थान सदैव श्रीदत्तमहाराज श्रीक्षेत्र गाणगापूर. “अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त” हा गुरुजींचा श्वास ! श्रीगुरुचरित्र ग्रंथ हा गुरुजींचा प्राण आणि “श्रीगरुदेवनिवास” हा उपक्रम हा त्यांचा ध्यास, अगदी प्राणांपलीकडे !

गुरुजींनी दिनांक २० ऑगस्ट २०१४ रोजी डोंबिवली येथील त्यांचे द्वितीय सुपुत्र संजय यांचे घरी देह ठेवला. मूर्तीच्या स्वरूपात गुरुजी आश्रमात पुन्हा सगुणरूपांत अवतरित आहेत. आश्रमात आजही क्तांना त्यांच्या असलेल्या चिरंतर आस्तित्ताची जाणीव होत आहे, स्वप्नदृष्टान्तामार्फत शिष्यांना अलौकिक मार्गदर्शन मिळत आहे. आणि गुरुजींमार्फत गुरुतत्त्वाच्या सोबत – सहवासाचे नित्य प्रत्यंतर आजही भक्तांना येत आहे. “श्रीगुरुचरित्र” घडत आहे !

श्रीगुरुचरित्र पारायणाद्वारे श्रीगुरु श्रीमननृसिंह सरस्वती महाराजांच्या चरणी सेवारत व्हा आणि आपली लौकिक उनत्ती आणि पारमार्थिक उददार करून घ्या. हीच मानवी जीवनाची गुरुकिल्ली आहे. असा पाठकगुरुजींचा सर्व भक्तांसाठी संदेश आहे.

म्हणे सरस्वती गंगाधरू । जवळी असता कल्पतरु । न ओळखिसी अंधवहिरू । वाया कष्टती दैन्यरीती ।।३७।।

भजा भजा हो श्रीगुरुसी। जें जें काम्य तुमचे मानसी । सिध्द होईल त्वरितेंसी । आम्हा प्रचिती आली असो ।। ३८ ।।
श्री गुरुचवित्र अध्याय ४७ वा

“या भारताची लोकशाही । होवोनि अध्यात्मिक लोकशाही वरो आदर्शशही। कृष्णकृपे, दत्तकृपे, स्वामीकृपे” असे गुरुजींचे श्रीदत्तमहाराजांकडे मागणे आहे.

श्रीगुरुदेवनिवास या स्थापन झालेल्या आश्रमात श्रीगुरुचरित्र पारायणसेवा अखंड चालू राहावी ही त्यांनी सांगिललेली त्यांची मनोकामना आज भक्तगणांच्या आश्रमात होण्याऱ्या पारायणसेवेमुळे फलद्रुप होताना दिसत आहे.

।। श्री गुरुदेव दत्त ।।

-– श्री. संतोष शामराव जोशी

साभार – गुरुतत्व मासिक, वर्ष ३ रे, अंक ५ वा, (अंक २९)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..