जया अंगी नाही द्वैत, अद्वैत भाव तेणे आत्मस्थिती जानितसे II
भाग २
गुरुगीतेमध्ये महेशानी अंबेला सांगितले, “जीवीत तेही समर्पिजे” म्हणजे सर्वस्व जो तुझा जीवात्मा आहे तो देखील तू अर्पण कर. काही शिल्लक ठेऊ नकोस.
“जीवात्मा अर्पण केलास कि शिवात्मा प्रगट होणे म्हणजे आत्मज्ञान प्रगत होणे. गुरुगीतेत सांगितल्याप्रमाणे मी तू रहीत होणे म्हणजेच जीवात्मा अविनाशाप्रत अर्पण करणे. परंतू जीवात्मा अविनाशाप्रत अर्पण होत नाही. जागृतीत आल्यानंतर परत माझे तुझे चालू होते. या मायावीतून आपल्याला बाहेर पडावयाचे असेल तर, माझे-तुझे रहीत होणे अत्यंत आवश्यक आहे. परंतू आत्मज्ञान अनुभवायचे असेल, त्या अविनाशाप्रत जायचे असेल तर माझे-तूझे करण्याचा काही उपयोग आहे का? तेथे द्वैताचा काय उपयोग? त्याकरिता आपणाला अद्वैत झाले पाहीजे. मनाचे मी तू रहीत होणे याचा अर्थ काय आहे कोणी सांगू शकेल? आणि कोणी असे म्हटले की मी आता मी-तू रहीत झालेलो आहे, तेव्हा कसे आणि कधी ते मनाला टिचकी मारतील ते कळणार नाही. हे कळण्याची, समजण्याची, जाणण्याची सेवेक-यानो तुमची कुवत नाही. कारण त्या अनंत शक्तीचा ठाव घेणे अत्यंत दुरापास्त आहे. करून अकर्ते पद आहे ते त्या शक्तीचा मुकाबला त्रिभुवनात कोणीही करू शकणार नाही. सतांनी हे सर्वस्व जाणले होते. म्हणून ते म्हणत असत, “अनंता मी तुमच्या चरणाचा दास आहे, माझे सर्वस्व आपणच आहात. मी माझा नाही.” आणि असे मन ज्यावेळी जीवात्म्याकडे व्यवहार करील त्यावेळी शिवात्मा प्रगत होईल. हेतुरहीत झाल्याखेरीज जीवात्मा सापडणे शक्य नाही. प्रथम जीवात्मा शोधण्यासाठी, त्याच्याप्रत जाण्यासाठी हेतूरहित होणे आवश्यक आहे.
पुढे चालू ………भाग ३
— मयुर तोंडवळकर
Leave a Reply