श्रीकांत सिनकर हे नाव ज्यांना माहीत असेल, त्यांना ते बहुधा पोलीस चातुर्यकथा नि तश्याच पद्धतीच्या कादंबऱ्यांच्या संदर्भात माहीत असण्याची शक्यता जास्त आहे. पण सिनकर हे त्यापलीकडेही काही लिहून गेले.
पोलीस चातुर्यकथा आणि रहस्यकथा लेखक श्रीकांत सिनकर यांचा जन्म ४ जानेवारी १९४० रोजी झाला.
पोलीस चातुर्यकथा लिहिणारे श्रीकांत सिनकर यांचे जीवन उच्चभ्रू समाजातील असले तरी त्यांचा वावर पोलीस, गुन्हेगार, मटका, दारूअड्डे, वेश्या वस्ती येथे कायम असायचा. त्या ठिकाणी भेटलेल्या व मनात एक स्थान निर्माण केलेल्या व्यक्तींवर त्यांनी ‘सैली १३ सप्टेंबर’ मध्ये लिहिले आहे. नेपाली वेश्या असलेल्या सैलीची शरीरापलीकडील लागलेली ओढ, तिचे निरागस वागणे, तिचे जग, त्याअनुषंगाने येणारे अंडरवर्ल्ड दर्शन, तसेच उच्चशिक्षित पण वैश्यावृत्तीची जिन जिमलेट, न्यूयॉर्क कॉटनच्या मटक्यावरील जगन, हातभट्टीवाला दत्तू या जीवाभावाच्या माणसांविषयीच्या आठवणी, चित्रविचीत्र अनुभव वाचकांना एक नवे, चाकोरीबाहेरचे जग दाखवितात.
हॅलो, इन्स्पेक्टर पेंडसे हियर, होटेल हेरिटेज मर्डर केस, आरामनगर पोलिस ठाणे, यातील खुनी हात कोणता, इ. वाकडकर हियर, बोलकी डायरी, अपुरे स्वप्न, अलविदा, आयपीएस, कावेबाज, मरिच, मी हा असा!!!, युद्ध, वाँटेड, सिनिक, स्मगलर, सैली, ३ सप्टेंबर असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे.
श्रीकांत सिनकर यांचे १० फेब्रुवारी १९९६ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply