नवीन लेखन...

संगीततुल्य अन् चौफर श्रीकांत ठाकरे

Shrikant Thakarey

“काही व्यक्तीमत्व अनेक कलागुणांसाठी तसंच विविध क्षेत्रात कारकीर्द घडवून त्यामध्ये यशस्वी होण्यासाठी प्रसिध्द असतात ; श्रीकांत ठाकरे, एक असं नाव ज्यामुळे मराठी संगीत सृष्टीला नव्या ढंगाची ताज्या दमाची आणि उ़डत्या चालीचा आविष्कार प्राप्त झाला; श्रीकांत ठाकरे यांची ओळख महाराष्ट्राला संगीतकार म्हणून तर होतेच; पण ते स्वत: उत्तम व्यंगचित्रकार, लेखक, समीक्षक, पत्रकार आणि आयुर्वेदाचे अभ्यासक देखील होते, त्यांच्या चौफेर व्यक्तिमत्वाचा अन् संगीत क्षेत्रासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दलचा हा परामर्श.

ठाकरे कुटुंबीय म्हणजे कलेच्या प्रांगणात रममाण असणारे, सामाजिक बांधिलकीचा ध्यास घेतलेले आणि सृजनशील; अर्थात हे सरकार प्रबोधनकार ठाकरे यांनी आपल्या प्रत्येक आपत्यांवर केले, त्यामुळेच आज महाराष्ट्राला सर्व कलांनी संपन्न असं घराणं पाहता आलं; स्वाभाविकच श्रीकांत ठाकरेंवर देखील कलागुणांचा प्रभाव पडत गेला आणि त्यांच्या रुपानं एक प्रतिभावंत व गुणी कलाकार रसिकांनी अनुभवला.

संगीतकार म्हणून श्रीकांतजी वॉयलीन वादनात निपुण होते, सतत वेगवेगळ्या संगीताच्या चाली त्यांच्या मनात रुंजी घालत आणि यामुळे सुरेल गाण्यांची निर्मिती त्यांच्या हातून झाली.

ज्येष्ठ गायक मोहम्मद रफी यांना मराठी गाण्यांची संधी श्रीकांत ठाकरे यांच्यामुळेच मिळाली. श्रीकांतजींनी संगीतबद्ध केलेली अनेक गाणी लोकप्रिय आहेत यामध्ये “अगं पोरी सवाल दर्याला तुफान”, “नको आरती की नको पुष्पमाला”, “तुझे रुप सखे गुलजार”, “प्रभू तू दयाळू”, “शोधीसी मानवा राऊळी मंदिरी” सारखी अवीट भक्ती, भाव आणि कोळी गीतांचा समावेश, मराठी संगीत विश्वात श्रीकांत ठाकरे आणि मोहम्मद रफी ही संगीत-गायक जोडगोळी म्हणजे “कानसेनांसाठी” पर्वणीच आहेत; तसंच “गझल” हा गाण्यांचा प्रकार श्रीकांतजींमुळे मराठीत रुजलाउ. उत्तरा केळकर, सुरेश वाडकर, शोभा गुर्टू, पुष्पा पागधरे सारख्या गायकांनी श्रीकांतजींच्या संगीताची सुरेलता वाढवली; “शूरा मी वंदिले”, “सवाई हवालदार”, “महानदीच्या तीरावर” सारख्या चित्रपटांची निर्मिती देखील श्रीकांत ठाकरे यांनी केली.
संगीत क्षेत्राच्या व्यतिरिक्त पत्रकारिता आणि चित्रपट संबंधी लेखन श्रीकांतजींनी केलं, यामध्ये नवीन चित्रपटांची समीक्षा असेल किंवा वैविध्यपूर्ण लेखन, त्यामध्येखास “ठाकरे टच” असायचा “परखड”, “सत्यता” आणि “वैचारिक” पैलू त्यांच्या लिखाणाच्या माध्यमातून मांडलेले दिसत;“मार्मिक” या मासिकात ६० व ७० च्या दशकात “शुद्ध निषाद” या नावाने “सिनेमाची समीक्षा” करणारे सदर लोकप्रिय ठरले.
श्रीकांत ठाकरे यांच्या व्यक्तीत्वाचे पैलू आणि चरित्र पट “जसे घडले तसे” या आत्मचरित्राच्या माध्यमातून वाचक आणि रसिकांना वाचायला मिळाला. १० डिसेंबर २००३ साली ते कालवश झाले.

(लेखन – संशोधन – सागर मालाडकर)

(छायाचित्र उपलब्धता- म.न.से मध्यवर्ती कार्यालय राजगड)

— सागर मालाडकर

Avatar
About सागर मालाडकर 111 Articles
श्री. सागर मालाडकर हे आकाशवाणीवरील निवेदक असून ते मराठीसृष्टीसाठी नियमितपणे लेखन करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..