वाहूनी कृष्णकमल तव शिरी,
अर्पितो भाव माझे श्रीहरी….।।धृ।।
तू आहेस ईश्वर,
करी सारे साकार
नशिब माझे थोर
मिळे तुझा आधार
सेवेसाठी कृपा होता मजवरी, शब्द गुंफूनी कविता करी….१,
अर्पितो भाव माझे श्री हरी….
विविधतेने नटलेले
कृष्णाचे जीवन गेले
लय लागूनी जगले,
कसे जगावे शिकवले
जीवन सारे असूनी रूप ईश्वरी, दाखवी स्वानूभवे तो हरी….२
अर्पितो भाव माझे श्री हरी,
रंगीबेरंगी कोमल
कृष्णकमळ फूल
पाकळ्या बघता निल
प्रसन्न चित्त होईल
दरवळू दे कृष्ण कमळा परि, सेवा भावाचे समाधान उरी…..३,
अर्पितो भाव माझे श्री हरी
राही न्यूनता काही
ही अज्ञानाची ग्वाही
मज क्षमा ती व्हावी
परि आशिर्वाद तू देई
उकलन तव जीवनाची करी, यशासाठी जावे त्याच वाटेवरी….४
अर्पितो भाव माझे श्री हरी
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply