जीवन होते कृष्णाचे आगळे विविधतेनें भरलेले सगळे,
गूढ, घनदाट जंगलापरी सारे पैलू साकार करी ।।१।।
जंगलामध्यें झाडे वाढती छोटी छोटी झुडुपे उगवती,
पसरे सर्वत्र वेलींच्या जाळी जल सांचूनी बनली तळी ।।२।।
गोड, आंबट, तुरट फळे सुंगधी तशीच उग्र फुले,
राघू, मैना, ससे, हरणे तसेंच हिंस्र पशूंचे फिरणे ।।३।।
जंगल दिसते भरलेले पूर्ण बरे वाईट यांचे चूर्ण,
कृष्णाचे जीवन तसेंच नटलेले चोर ते संतापर्यत गेलेले ।।४।।
चोरी केली, खोड्या केल्या नटखट बनूनी घागरी फोडल्या,
प्रेमिकांचे जाळे भोंवती नाच नाचला तालावरती ।।५।।
मुरली वाजवूनी गुंगवी मधूर गीताने डोलवी,
राजकारणी म्हणून जगला युक्तीने नमवी शत्रूला ।।६।।
युद्धभूमिच्या प्रसंगी अर्जूनास तो गीता सांगी,
सोळा कलांचे रूप मिळाले पूर्ण अवतारी जीवन जगले ।।७।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply