भारतीय टपालखात्याच्या ‘पिन कोड’ प्रणालीचे जनक, संस्कृत व पाली भाषेचे गाढे अभ्यासक श्रीराम भिकाजी वेलणकर यांचा जन्म २२ जून रोजी झाला.
ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं त्यांच्या पत्रव्यवहारासाठी १७२७ मध्ये कोलकात्यात पोस्टाची सेवा चालू केली. श्रीराम भिकाजी वेलणकर हे ब्रिटिशांच्या राज्यात आयसीएसंच्या लेखी परीक्षेत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले तरीही त्यांना पोस्ट आणि टेलीग्राफ खात्याच्या तोंडी परीक्षेत ठरवून अनुत्तीर्ण करण्यात आले होते. कारण ह्या दोन परीक्षांमधील काळात रत्नागिरीच्या जिल्ह्याधिकाऱ्याकडून मागविलेल्या इतिवृत्तानुसार, सावरकर रत्नागिरीत स्थानबद्ध असतांना संध्याकाळी आपल्या घरी लहान मुलांना जमवून गोष्टी सांगत त्या ऐकायला श्रीराम भिकाजी वेलणकर नावाचा मुलगा जात होता अशी माहिती ब्रिटीश सरकारला कळली होती.
भारतातल्या वाढत्या पत्रसेवेचा भार सांभाळणं हे दिवसेंदिवस मोठं काम होऊ लागलं होतं. त्यातच निरनिराळ्या भाषा, अपुरे लिहिलेले पत्ते अशा इतर अडचणीही होत्या. नंतर आपल्या पोस्ट आणि टेलीग्राफ नोकरीत असताना मा.श्रीराम भिकाजी वेलणकर त्यावर उपाय म्हणून श्री. श्रीराम भिकाजी वेलणकर यांनी १५ ऑगस्ट १९७२ रोजी पिन कोड पद्धत अंमलात आणली. श्री. श्रीराम भिकाजी वेलणकर यांना ‘पिन कोड’ प्रणालीचे जनक म्हणतात. या पिनकोडमुळे बरीच कामं सोपी झाली हे खरं. श्रीराम भिकाजी वेलणकर हे संस्कृत पंडित होते व पाली भाषेचे गाढे अभ्यासक होते. श्रीराम भिकाजी वेलणकर यांचे १ एप्रिल १९९९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
आज दुदैवाने या श्रीराम भिकाजी वेलणकर यांच्या बद्दल खूप कमी माहिती उपलब्ध आहे.
Leave a Reply