आमच्या आजोळी वाई येथे मामाच्या वाड्यात रामफळाचे दोन मोठे वृक्ष होते. आम्ही वाईला असताना रामनवमीच्या दरम्यान त्यास खूप फळे यायची. त्यावेळी आम्ही रामफळांचा मनोसोक्त स्वाद चाखला. पण त्या वेळी या फळांमध्ये काही औषधी गुणधर्म असतात असे कधीही वाटले नाही. अगदी काल परवा पर्यंत या विषयी मी काहीच विचारच केला नव्हता. की या फळाचे काही औषधी उपयोग आहेत का? या फळांमध्ये असणारे अनेक औषधी गुणधर्म वाचून अचंबित झालो आणी हा लेख लिहायला घेतला. रामफळा विषयी अधिक थोडी माहिती आणि त्याचे औषधी व इतर गुणधर्म काय हे जाणून घेऊया. रामफळ भारतात बाजार पेठांमध्येही उपलब्ध असले तरीही अनेकांनी त्याची अजून एकदाही चव चाखली नसेल अशा बऱ्याच व्यक्ती असतील.
हिवाळा हा ऋतू आता सुरू झाला आहे. हिवाळ्यामध्ये रामफळ आपल्याला बाजारात दिसते. थंडी मध्ये येणारी सर्व फळे सेवन केली पाहिजे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. तसेच रामफळ हे बहूतेक लोकांना आवडत नाही. आवडत जरी नसले तरी याचे एकदा सेवन करून तुम्ही बघा, कारण रामफळ हे आरोग्यासाठी खूप उतम फळ आहे. हल्ली पूर्वी प्रमाणे भरपूर रामफळे बाजारात येत नाहीत कारण त्याची मुद्दामहून लागवड कोणी करत नाही व जुनी झाडे नष्ट होताहेत.
ह्या फळाला रामफळ हे नाव का पडले ह्याचीही एक आख्यायिका आहे. त्रेतायुगात रावणाचा वध केल्यावर रामास ब्रम्ह हत्येचे दोष लागला. ज्याच्या निवारणासाठी श्रीराम हृषीकेश येथे आले होते. श्रीरामांना तेथील ही फळे खूप आवडली होती, म्हणून त्यांना रामफळ असे नाव मिळाले. रामफळ हे हृषिकेशला फक्त राम झुल्यावरच मिळते.
माहिती:
रामफळ (इंग्रजीत: Bullock’s Heart,)
सामान्य नाव: Custard Apple;
शास्त्रीय नाव : Annona reticulata/ अनोना रेटिक्युलाटा)
हिं. लौना, सं. रामफळ
हे एक मध्यम उंचीचे वृक्ष असून या झाडाची पाने पेरूच्या पानांसारखी असतात. हे झाड कमी प्रमाणात आढळते. रामफळ हे एक गोड फळ असून उन्हाळ्यात रामनवमी दरम्यान येत असते. फळाचे आवरण तपकिरी, केशरी रंगाचे असते. रामफळ हे उष्णकटिबंधीय हंगामी फळ असून ते एकाच कुटुंबातील असल्याने सीताफळशी जवळचे साम्य आहे. आसाम, गुजरात, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू आणि इतर काही राज्यांमध्ये प्रामुख्याने आढळतात. रामफळ हे अर्ध-सदाहरित पानझडी वनस्पतीचे फळ आहे ज्याला कस्टर्ड सफरचंद, जंगली मिठाई, आंबट, बैलांचे हृदय अशा नावानी पण ओळखले जाते. चवीनुसार कस्टर्ड सफरचंद सारखेच असते.
रामफळ हे सिताफळाच्याच जातीचे असते. खायला अतिशय चवदार आणि दिसायला आकर्षक असलेल्या रामफळाची रामजन्माच्या वेळी म्हणजे रामनवमीच्या सुमारास पिकायला सुरुवात होते.
रामफळ वृक्ष:
रामफळ वृक्ष सदरात मोडणारी ही वनस्पती साधारणता 9 ते 15 मीटर उंच वाढते या वनस्पतीचे मूळस्थान वेस्टइंडीज मधील आहे. तेथे लोक या फळाला “बुलक हार्ट” म्हणतात. भारतात हा वृक्ष वेस्टइंडीज मधून आणला गेला. या फळा बरोबरच सिताफळ, हनुमान, आणि मामफळ या फळांच्या जाती देखील वेस्टइंडीज मधून भारतात आणल्या गेल्या आहेत. यापैकी सीताफळ हेच फळ त्याच्या उत्तम चवीमुळे अधिक लोकप्रिय झाले. बाकीची फळे फारशी लोकप्रिय झाली नाहीत. रामफळाची व्यापारी लागवड फारशी कुठे दिसून येत नाही. त्यामुळे हे फळ क्वचितच बाजारात दिसते. हे जगातील उष्णकटिबंधीय आणि उप-उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये मोठ्या प्रमाणावर वितरीत केले जाते.
महाराष्ट्रातील आढळ :कोकणात थोड्याफार प्रमाणात रामफळाची झाडे दिसून येतात. विदर्भात तुरळक प्रमाणात राम फळाची झाडे आढळतात. तसेच मद्ध्य महाराष्ट्रातही हे वृक्ष आढळून येतात
भारतात याचा व्यावसायिकरित्या टेबल फळ म्हणून वापर केला जातो आणि बंगाल आणि भारताच्या दक्षिण भागात लागवड केली जाते. खोड पांढरट कथ्थी किंवा तपकिरीरंगाची असते. फांद्या आणि लाकूड तसे कच्चे असते. जास्त वजन दिल्यास लगेच मोडते. वृक्षाला भरपूर पाने असल्यामुळे वृक्षाखाली नेहमीच दाट सावली राहते. पानगळती साधारणतः एप्रिल अखेर किंवा मे महिन्यात होते. त्यामुळे वर्षभर या वृक्षाखाली दाट सावली राहते.
पाने: पाने एक आड एक येतात. त्यांचा आकार आंबा, पेरूच्या पानांचा सारखाच असून ती कमी जाड असून जास्त रुंद व लांब असतात. पण ती अधिक पातळ असून लांबी साधारणतः १२ ते २० सेंमी. लांब आणि ७ ते ८ सेंमी. रुंद असतात. पानांमध्ये एक उभी शीर असून त्यावर १७ते १८ आडव्या उप रेषा असतात. पाने विषारी असतात.पानांवर कुठलीही कीड दिसून येत नाही. कीटकनाशका सारखा पानांचा आणि बियांचा वापर करता येतो. पानांना एक विशिष्ट वास असतो.
फुले: फुले पावसाळ्यात येतात. फुले पानां शेजारी पेरावर उगवतात. फुले तीन ते चारच्या संख्येने येतात. सिताफळ फुलांपेक्षा रामफळाची फुले मोठी असतात. हिरवट पिवळसर रंगाची त्रिपाठी असतात. दिसायला फुले सिताफळाच्या फुलासारखी सारखीच दिसतात. फुलांमध्ये सहा पाकळ्या असतात.
फळेः हिवाळ्यात येतात. ती तुरळक प्रमाणात असतात. फळे पांढरट हिरवी सिताफळाच्या रंगाची असतात. फळे पिकल्यावर पिवळसर गुलाबी किंवा लाल-केसरी होतात. सर्वच फळे एकाच वेळी पिकत नाहीत. फळाचे वजन एक किलो पर्यंत असू शकते. फळांचा आकार हृदयासारखा असतो. फळ पंधरा ते वीस सेंमी.व्यासाचे, बैलाच्या हृदयाच्या आकाराचे फळ असते. म्हणून या फळाला “बुलक हार्ट “असे नाव पडले असावे. तयार फळांवर पंचकोन आकृती रेषा दिसतात. नामकोषाने म्हणूनच याचे नाव रेटिक्यूलाटा दिले असावे. फळाची साल पातळ असते. गर सिताफळा पेक्षा पातळ असतो तसेच तो कमी गोड व ठिसूळ रवाळ असतो. जो थोडा आंबूस गोड असतो. फळे वसंत पंचमी नंतर गुढीपाडवा ते रामनवमी च्या दरम्यान पिकतात. फळांमध्ये काळपट टणक गुळगुळीत बिया असतात. सिताफळा पेक्षा रामफळांमध्ये गर जास्त आणि बिया कमी प्रमाणात असतात.
बीया: बिया काळपट तपकिरी गुळगुळीत लांबुळक्या अगदी सिताफळाच्या बियांचा सारख्या दिसणाऱ्या असतात. बियांचे कवच अतिशय टणक असते, जे सहजासहजी फुटत नाही. बिया ह्या विषारी असतात. बीया आणी पाने विषारी असल्याने त्यांचा वापर कीटकनाशक म्हणून करता येतो. या झाडावर कुठल्याही प्रकारची कीड दिसून येत नाही. या बियांपासून रोपे तयार करता येतात . रामफळाची अभिवृद्धी मृदूकाष्ट कलम किंवा डोळे भरून देखील करता येते.
फळांमधील उपयोगी घटक:
100 ग्रॅम फळामध्ये हे समाविष्ट आहे:
1. 100 ग्रॅम फळामध्ये हे समाविष्ट आहे: 70 किलो कॅलरी
2. 15.7 ग्रॅम कार्बोहायड्रेट,
3. 20 मिग्रॅ फॉस्फरस
4. 2 मिलीग्राम व्हिटॅमिन बी 6
5. 30 मिग्रॅ कॅल्शियम
6. 19 मिलीग्राम व्हिटॅमिन सी
7. 2.5 ग्रॅम फायबर
8. 6 ग्रॅम चरबी
9. 70 किलो कॅलरी ऊर्जा
रामफळा मधील रासायनिक घटक:
रामफळांमध्ये भरपूर प्रमाणात एंटिऑक्सीडेंट, व्हिटामिन ए, व्हिटामिन सी , कॅल्शियम, फॉस्फरस आणी लोह असते. राम फळांमध्ये फायटोन्यूट्रिएन्टस कमालीचे असतात. हे घटक शरीरात प्रतिकारशक्ती (इम्युनिटी ) तयार करतात, त्यामुळे इतर विषाणूपासून किंवा विषाणूंचे संक्रमण रोखण्यास रामफळ अत्यंत उपयुक्त असते. एंन्टिइन्फ्लमेटरी, एंन्टिमायक्रोबियल, एंन्टिग्लायसेमिक, फायबर, व्हिक्टोरिया बी६ असे विविध घटक असतात. रामफळाच्या कोवळ्या फांद्यांमध्मे टॅनिन असते तर फळांच्या सालीमध्ये आनोनाइन अल्कोलाईड असते. या गुणामुळे रामफळाचे औषधी गुणधर्म वाढतात.
रामफळाचे औषधी गुणधर्म:
रामफळांमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत.
रोग प्रतिकार शक्ति (इम्युनिटी) वाढविण्यासाठी: रामफळा मध्ये एंटीऑक्सीडेंट, व्हिट्यामिन सी, व्हिट्यामिन बी 6,एंटिइन्फ्लेमिटरी गुण, फायटोन्यूट्रिएंट्स, फॉस्फरस, कॅल्शियम लोह, हे कमालीचे असतात. रामफळाच्या सेवनाने शरीरात प्रतिकारशक्ती निर्माण होते. ते अगदी करोना विषाणूंना देखील शरीर प्रतिकार करू शकते असे संदर्भ सापडतात.
डोळ्याच्या आरोग्यासाठी उपयुक्त : डोळ्यांचे विविध आजार, दृष्टीत वाढ करण्यासाठी रामफळाचे सेवन फारच उपयुक्त असते. कारण रामफळांमध्ये व्हिटॅमिन सी आणि ए भरपूर प्रमाणात असते. त्याच प्रमाणे व्हिटॅमिन बी २ पण यात असते, यामुळे डोळ्याच्या वेगवेगळ्या समस्यांवर रामफळाचे सेवन फारच उपयुक्त ठरते.
मधुमेहाची जोखीम कमी राखण्यास उपयुक्त: रक्तातील साखरेचे प्रमाण योग्य राखण्यासाठी रामफळाचे सेवन उपयुक्त असल्याचे संदर्भ आहेत. या फळात असणारे एंटिहायपरग्लायसेमिक हे रक्तातील साखर वाढण्यापासून रोखते. प्रिडायबेटीक लोकांनी या फळाचे सेवन केल्यास त्यांना मधुमेहापासून दूर राहण्यास मदत होते.
पचनसंस्था योग्य राखण्यासाठी उपयुक्त : रामफळांमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असल्याने पचन योग्य प्रकारे होते. तसेच मॅग्नेशियम हे असल्याने अपचन आणि बद्धकोष्टता यात सुधारणा होऊन पचन सुलभ होऊन, पचनसंस्था योग्य राहण्यास मदत होते.
कॅन्सर पासून संरक्षण आणि उपचारासाठी उपयुक्त : राम फळांमध्ये फायटोकेमिकल्स हे भरपूर असतात. रामफळात असणारे एंटिऑक्सिडंट हे फ्री रॅडिकल्स (रोगाबरोबर) बरोबर लढतात आणि शरीरातील निरोगी पेशीचे संरक्षण करतात. तसेच नविन रोगट पेशींची निर्मिती थांबवते. एका अभ्यासात असे आढळून आले आहे की ब्रेस्ट कॅन्सर मध्ये रामफळ सेवन फायदेशीर आढळून आले आहे. चेहर्यावरचे मुरूम दुर करण्यासाठी उपयुक्त : रामफळांमध्ये एंटीमायक्रोबियल गुण असल्याने त्याच्या सेवनाने चेहऱ्यावर मुरूम तयार करणाऱ्या बॅक्टेरियायांना रोखले जाते आणि त्यामुळे चेहऱ्यावर मुरुमांची निर्मिती होत नाही.
अल्सर कमी करण्यासाठी उपयुक्त : रामफळाचे सेवन अल्सर कमी करण्यास उपयुक्त असून हिरड्या वरील सूज कमी करण्यास मदतगार असल्याचे संदर्भ आहेत. त्यासाठी रामफळाची साल फायदेशीर आहे. हृदयरोग दुर ठेऊन रक्तदाब योग्य राखण्यासाठी उपयुक्त : रामफळाचे सेवन हे हृदयरोग दूर ठेवून रक्तदाब योग्य राखण्यास उपयुक्त असल्याचे आढळून आले आहे. रामफळात भरपूर असणारे नायसिन आणि फायबर तसेच मॅग्नेशियम आणि पोटॅशियम हृदयरोगात फायदेशीर ठरतात. नायसिन आणि फायबर कोलेस्टेरॉल कमी करून, त्यात असणारे व्हिटॅमिन बी 6, हृदयरोगाची शक्यता कमी करतात आणि एकंदरीत हृदयाचे स्वास्थ्य योग्य राखण्यास रामपळाचे सेवन मदत करतात. राम फळाचे सेवन वजन वाढविण्यासाठी,उच्च रक्तदाब योग्य राखण्यास, गर्भपात रोखण्यास आणि प्रसूतीनंतर दूध न येणाऱ्या स्त्रियांमध्ये दुधाची वाढ करण्यास उपयुक्त असल्याचे तसेच त्वचेच्या आणि केसांच्या स्वास्थ्यासाठी उपयुक्त असल्याचे दिसून आले आहे.
कच्च्या फळातील मगज कृमिनाशक असून पक्व पळ आमांशनाशक आहे तसेच ते पित्तनाशक व तृष्णाशामक (तहान कमी करणारे) आहे. ते स्तंभक (आकुंचन करणारे) असून रक्तदोषांवर उपयुक्त असते.
ऊर्जा आणि लोहयुक्त फळ (रामफळ):
कर्बोदकांमधे भरपूर प्रमाणात असणे हे झटपट ऊर्जेचा उत्कृष्ट स्त्रोत आहे. व्हिटॅमिन बी 6 देखील मूत्रपिंडातील दगडांच्या विकासास प्रतिबंध करते. रामफळ अशक्तपणावर उपचार करण्यास मदत करते कारण त्यात असलेले लोह हिमोग्लोबिन तयार करण्यास आणि शरीराच्या पेशींमध्ये ऑक्सिजनची वाहतूक करण्यास मदत करते. त्वचेच्या आरोग्यासाठी रामफळ फायदेशीर मानले जाते. केसांसाठी ठरते फायदेशीर केसांसाठीही रामफळ फायदेशीर ठरते. केसांना मुळापासून मजबुत करण्यासाठी फायदेशीर मानले जाते.
रामफळाचे काही वाईट परिणाम : रामफळाच्या बीया आणि पाने विषारी असून विषबाधा होऊ शकते. चुकून बी गिळण्याने काही होत नाही, कारण बियांचा बाह्य कवच खूप कठीण आणि टणक असते ते पोटात फुटत नाही अन् दुसऱ्या दिवशी शौच्यावाटे बाहेर पडते. पण बी फोडून खाल्ल्यास विषबाधा होते. ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी रामफळ खाऊ नये कारण रामफळ खाल्ल्याने वजन वाढते. Annonaceae फळांच्या कुटुंबातील फळांपासून ऍलर्जी असलेल्या व्यक्तींना, ज्यांना मधुमेह किंवा रक्तातील साखरेचा त्रास आहे, किडनीचा त्रास, कमी रक्तदाब किंवा काही औषधे घेत आहेत त्यांनी रामफळाचे जास्त सेवन टाळावे.
रामफळापासून बनवलेले पदार्थ:
रामफळ कस्टर्ड
• रामफळ मिल्कशेक/स्मूदी रेसिपी: रामफळाचा लगदा, ताजी मलई, दूध, तुमची आवडीची स्वीटनर मिसळा आणि मिल्कशेक बनवा. रिमझिम मधाच्या सरबत बरोबर सर्व्ह करा. रामफळ, दोन ग्लास दूध, दालचिनी आणि काजू घाला. सर्व काही स्मूदीमध्ये मिसळा.
• रामफळ आईस्क्रीम/कुल्फी रेसिपी: या व्यतिरिक्त, रामफळ घरगुती आईस्क्रीम देखील एक चांगली पैज आहे, फळ जसे आहे तसे सेवन करणे किंवा तुमच्या आवडत्या कस्टर्डमधील टॉपिंग्ज देखील उत्कृष्ट आहेत. रामफळ चवीची कुल्फी ही लहान मुलांसह सर्वांसाठी उन्हाळी ट्रीट असू शकते.
• रामफळ फ्रोझन योगर्ट रेसिपी: तुमचा आवडता रामफळ फ्रोझन योगर्ट बनवा आणि त्यात समान प्रमाणात रामफळ पल्प, ग्रीक योगर्ट, थोडे मध, लिंबाचा रस मिसळा आणि गोठवा. नट आणि मॅपल सिरपच्या रिमझिम सरीसह सर्व्ह करा.
संदर्भ :
1. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials Vol.I, Delhi, 1948.
2. Kirtikar, K. R. Basu, B. D. Indian Medicinal Plants, Vol.I, Delhi, 1975.
3. मराठी विकिपेडिया
4. गुगल वरील अनेक लेख
5. सर्व फोटो गुगलच्या सौजन्याने
डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
मोबा. ९८८१२०४९०४
०४/०१ /२०२५
Leave a Reply