श्रीरंग गोडबोले. खऱ्या अर्थाने चतुरस्र वल्ली. उत्तम लेखक… कवी… निर्माते… दिग्दर्शक आणि बरेच काही ! श्रीरंग गोडबोले हे खरोखर काव्यात्मक आविष्कार घडवू शकणारे रंगकर्मी आहेत. त्यांचा जन्म १५ जून १९६० रोजी पुणे येथे झाला. नाटक, सिनेमा अणि टेलिव्हिजन या सगळ्या माध्यमांमध्ये त्यांनी पेक्षकांना गुंगवलेलं आहे. श्रीरंग गोडबोले यांनी एस.एस.सी. पर्यंतचं शिक्षण पुण्यात घेतलं. कॉलेज रुईया, झेविअर्समध्ये केलं आणि नंतर इंजिनीअरिंग केलं. श्रीरंग गोडबोले यांनी १९७९ मध्ये थिऐटर अॅकाडमीतून आपले अभिनयाचे करियरला सुरवात केली. त्यांनी जब्बार पटेल यांच्या घाशीराम कोतवाल, पडघम, सतीश आळेकर यांच्या प्रलय, महानिर्वाण, भिंत अश्या नाटकात कामे करून या व्यवसायात जम बसवला.
१९८६ साला पासून त्यांनी स्वत:च नाटके लिहिण्यास सुरवात केली. पहिले नाटक होते ‘रंगमंचावर वावरतानाचे कलाकार आणि ग्रीनरूममध्ये वावरतानाचे कलाकर आणि त्यांचे संबंध’ या विषयावर होतं. हे नाटक लिहिताना त्यांची ही कल्पना कुणाला पटली नाही. मग ठरवलं, आपणच नाटक लिहायचं आणि त्यांनी ते नाटक लिहिलं. या नाटकाला राज्य नाटय़ स्पर्धेत सगळी बक्षिसं मिळाली. हे नाटक गाजल्यावर श्रीरंग गोडबोले यांच्यात एक विश्वास आला. त्या काळी ग्रिप्स ची चळवळ जोरात चालू होती. पुण्याच्या ग्रिप्स थिएटरला ते जॉइन झाले.
मोहन आगाशेंच्या सांगण्यावरून त्यांनी बालनाटय़ं लिहिली, तीदेखील गाजली. ग्रिप्स थिएटरला त्यांचा मोठा ग्रुप झाला. आम्ही नवनवीन नाटकं करायचो, शिबिरं करायचो. श्रीरंग गोडबोले यांनी विद्यार्थी संघटनेमध्ये काम केलं असल्याने माणसं जोडण्याचा गुण उपयोगी ठरला. एक उत्तम दिग्दर्शक होण्यासाठी या गुणांची आवश्यकता असते. त्या सुमारास टेलिव्हिजनवर सीरिअल्स जोरात सुरू झाल्या होत्या. तेव्हा तीनच वाहिन्या होत्या. अल्फा मराठी, ई मराठी आणि प्रभात याच खासगी वाहिन्या होत्या. निर्माते अजय सरपोतदार यांनी श्रीरंग गोडबोले यांचे काम पाहिलेलं असल्याने त्यांनी सीरियल बनवण्याचं काम दिलं. यानंतर इव्हेंट्स डिरेक्ट करायची संधी मिळाली. याचा श्रीरंग गोडबोले यांना काही अनुभव नव्हता, पण चॅलेंजेस घेत गेले, आणि पुढचं पाऊल टाकलं सिनेमा मध्ये चिंटू १, चिंटू २, मंगल पांडे, पितृऋण… नंतर हरिश्चंद्राची फॅक्टरी हा सिनेमा त्यांनी एक्झिक्युटिव्ह प्रोडय़ुसर म्हणून केला. श्रीरंग गोडबोले यांची गाणी म्हणाल तर सोपी व भावपूर्ण. सा रे ग म प.. एकापेक्षा एक.. घडलंय बिघडलंय.. तुझ्यात जीव रंगला, लख लख चंदेरी, अग्निहोत्र या साठी श्रीरंग गोडबोले यांनी टायटल साँग लिहिली आहेत.
इंडियन मॅजिक आय ही श्रीरंग गोडबोले यांच्या निर्मिती संस्था आहे. या निर्मिती संस्थेने ‘झी मराठी’च्या सहयोगाने एक भन्नाट, वेगळं, आजचं वाटणारं आणि सुंदर ‘इडियट्स’ नावाचं नाटक नुकतंच रंगमंचावर आणलंय. श्रीरंग गोडबोले यांचा मुलगा सुहृद हा पण निर्माता आहे. त्यांची मुलगी मृण्मयी आणि सून गिरिजा ओक या अभिनेत्री आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply