शृंगार मराठीचा नववधू परी,
अनुस्वाराचं कुंकू भाळावरी.
प्रश्न चिन्हांचे डूल डुलती कानी,
स्वल्पविरामाची नथ भर घाली.
काना काना जोडून राणी हार केला,
वेलांटीचा पदर शोभे तिला.
मात्र्यात गुंफिले चाफ्याचे फूल
वेणीत माळता पडे भूल
उद् गारवाचक छल्ला असे कमरेला
अवतरणाची लट खुलवी मुखड्याला
उकाराची पैंजण छुमछुम करी
पूर्णविरामाची तीट गालावरी.
— WhatsApp वरुन
he kavita SANGITA ZINJURKE ,pune yanchi aahe,contact no.9527734282