शुभ-मंगल-सावधान
काळाचे ते विधान
राखावे प्रसंगावधान
दीप उजळती!!
अर्थ–
आग्र्याहून सुटताना छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या साथीदारांनी प्रसंगावधान राखले म्हणून स्वराज्याचा राजा औरंग्याच्या अटकेतून सुखरूप बाहेर पडू शकला.
बोहल्यावर चढलेल्या 12 वर्षाच्या नारायणास शुभ मंगल सावधान हे शब्द ऐकल्यावर प्रसंगावधान राखावे हे लक्षात आले म्हणून पुढे समर्थ घडले.
शुभ-मंगल-सावधान अन त्यात वेळोवेळी प्रसंगावधान- काळाचे विधान हे पाळले गेले म्हणून स्वराज्याचा दीप उजळला.
पण प्रसंगावधान राखता न आले आणि स्वराज्याचा दुसरा राजा संभाजी मात्र स्वकीयांच्या मतलबी पणामुळे आपलं सर्वस्व गमावून बसला.
आपले आयुष्य जगताना नजर स्थिर, विचार भविष्याचा करायचा असेल तर मला वाटतं प्रसंगावधान पाळणे अत्यंत गरजेचे आहे. नाहीतर आजकाल अभ्यास कर म्हणून सांगितले तरी खून होतो आणि अभ्यास करू दिला नाही म्हणूनही होतो. संकटं इतक्या धोक्याच्या पातळीवर आलेली आहेत आणि माणुसकी रसातळाला गेली आहे.
अखंड ते सावधान, सूचक शब्दांचे विधान, माणुसकीचे दान, जरूर करावे!!
— सुमंत परचुरे.
Leave a Reply