काही महिन्यांपूर्वी एका भावाशी चॅट करत होते. थोडा disturbed होता तो. त्यामुळे सांगत होता, की “ताई, तुझ्याशी बोलून नेहमी खूप positive वाटतं. तू प्लीज माझ्यासाठी रोज एक good morning मेसेज टाकशील? खूप मदत होईल त्याची मला..”
त्यात नाही म्हणण्यासारखं काही नव्हतंच मुळी, पण practically रोज ते शक्य नव्हतं. तरी मी निक्षून काही दिवस follow केलंही ते.. पण मुळातच मी कुणालाही रोज सुप्रभात किंवा शुभरात्री मेसेज पाठवत नाही, त्यामुळे न विसरता ह्याला पाठवणं जरा कठीणच होतं. तसंच एक-दोन आठवड्यांत ते सुटून गेलंच.
त्याही पेक्षा एक रोज मनात यायचं, की हे self motivation आतूनच यायला हवं की नाही? म्हणजे दुसऱ्याला तसंच स्वतःलाही कार्यरत ठेवण्याबद्दलचं..! माझ्या नशिबी आज जसं आयुष्य आलेलं आहे, ते आहे त्यात सुंदर बनविण्याचा प्रयत्न दर दिवशी नव्या जोमाने करणे, एवढं तरी माझं माझ्या हातात आहे.
आशाताई (सौ. आशा नगरकर) एकदा म्हणालेल्या आम्हा तरुण आयांना, की “आपल्या शारीरिक आणि मानसिक सौन्दर्याची किंमत आपली आपल्यालाच पहिले कळली पाहिजे. आणि त्यासाठी सर्वात महत्त्वाचं हे, की, आपणच त्यासाठी झटलं पाहिजे.”
पण असं होतंही खरं, एकेक दिवस उजाडूच नये मुळी असं वाटत असतं… what works for me on such mornings is.. त्या विचारावर न थांबता, उठून कामाला लागणं! शारीरिक हालचाल सुरू झाली, की मेंदूलाही चेतना मिळतेच. आपल्या अस्तित्वाचा प्रसन्न दाखला, म्हणजे आपल्या मेंदूची झळाळी होय! तो नित्य कार्यरत राहिला की त्याच्या आवडीचं खाद्यही शोधून घेतो, आणि तन-मनाने आपल्याला त्यात व्यवस्थित गुंतवून ठेवतो.
त्यामुळे माझं असणं, हे कुणासाठी matter करतं का नाही, हे दुसऱ्या कुणाला तरी ठरवू देण्यापेक्षा, आपणच ते ठरवून घेतलं तर..! दररोज पहाटे सूर्याने उगवण्याची वाट पाहाण्यापेक्षा, आपणच उठून त्याला निखळ हसून शुभ-प्रभात म्हटलं तर!
सुप्रभात!
— प्रज्ञा वझे घारपुरे
Leave a Reply