खिन्न मनानें बसला होता, उन्हांत एका खडकावरी ।
डबके घाण पाण्याचे, वातावरण दुषित करी ।।
किड्या-मुंग्यांचे वारूळ तेथें, आणिक पडला काडी कचरा ।
नजिक येईना वाटसरूं कुणी, बघूनी सारा गालिच्छ पसारा ।।
सोडून देऊनी निवारा , नदीकांठच्या शिखरीं गेला ।
निर्मळ करूनी जागा, आश्रम त्याने एक बांधला ।।
बाग फुलवूनी सुंदर तेथें फळा फुलांना येई बहर ।
राघू मैना मयुर पक्षी, गाऊनी नाचती तालावर ।।
निसर्गरम्य सौंदर्य ठेवा, बाळगला जो त्या परिसरी ।
धुंद राही तो सदैव तेथें विसरूनी इतर जनांपरी ।।
जमू लागले वाटसरू, घेती विसावा कांहींक्षण ।
विनानिमंत्रित येत होते, बघूनी प्रसन्न वातावरण ।।
लाभे प्रभू सहवास त्यांना, निर्मळ देही पवित्र मनी ।
तोच येईल तुम्हा भेटण्या, देह मंदिर केवळ बघूनी ।।
डॉ भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply