समजण आणि असणं
याच्यात तिनशे साठ
अंशाचा कोन होतो
त्यांच्या समीकरणातून
माणूस शून्यात जाऊन पोहचतो ||
कर्तबगारीच्या जमेतून
प्रौ़ढीची वजाबाकी करतो
त्यावेळी माणूस परत
शून्याकडेच वळतो ||
सत्कर्माच्या गुणाकराला
अनितीने भागतो त्यावेळी
माणूस परत शून्याकडे वळतो ||
हरिस्मरणाचे बीजगणीत
श्रध्देने सोडवत जातो त्यावेळीही
माणूस शून्याकडे जाऊन पोहचतो ||
— चंदाराणी कोंडाळकर
Leave a Reply