सिबलिंग डे अमेरिकेत दरवर्षी १० एप्रिल रोजी साजरा केला जातो. तर दुसरीकडे, युरोपमध्ये दरवर्षी ३१ मे सिबलिंग डे साजरा केला जातो. सिब्बलिंग डेची सुरुवात अमेरिकेत १० एप्रिल १९९७ रोजी झाली. असे म्हटले जाते की क्लोडिया एव्हर्टने सिबलिंग डे साजरा करण्याची कल्पना दिली. यासाठी त्यांनी सिबलिंग फाऊंडेशनची स्थापना केली, ज्याला अमेरिकन कॉंग्रेसने एकमताने मान्य दिली. यानंतर दरवर्षी १० एप्रिल रोजी सिबलिंग डे साजरा करण्यास सुरुवात झाली.असे म्हटले जाते की क्लोडिया एव्हर्टने आपल्या वडिलांचे बालपणात मृत्यू पावलेल्या एलन आणि लिस्ट या भावंडांच्या सन्मानार्थ या दिवसाची सुरुवात केली.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply