ग्रीस देशात फार पूर्वी डेमॉक्रेटस नावाचा अतिशय मोठा तत्त्वज्ञानी व विचारवंत होऊन गेला. एका सायंकाळी तो बाजारात गेला असता त्याला रस्त्याच्या कडेने डोक्यावर वडिलांचा आहे. मात्र लाकडाची अतिशय मोठी मोळी घेऊन जात असलेला एक मुलगा दिसला. मोळीचे ओझे खूप असल्याचे त्या मुलाच्या चेहऱ्यावर दिसत होते. तरीही तो मुलगा ते अवजड ओझे डोक्यावर घेऊन पुढे जात होता. डेमॉक्रेटस त्याच्याजवळ गेला व त्याने त्याला विचारले की, ही एवढी मोठी लाकडाची मोळी तू – घेऊन तू कोठे चालला आहोस? त्यावर तो म्हणाला की, माझ्या वडिलांचा लाकूड-विक्रीचा व्यवसाय आहे. मात्र ते आजारी असल्यामुळे आज बाजारात येऊ शकले नाहीत. त्यांच्याऐवजी मीच ही लाकडाची मोळी घेऊन जात आहे. त्यावर डेमॉक्रेटसने त्या मुलाला विचारले की, अडचणीच्या वेळी वडिलांना त्यांच्या व्यवसायात मदत करणे ही चांगलीच गोष्ट आहे. मात्र -त्याखेरीज तू काय करतोस? त्यावर त्या मुलाने उत्तर दिले की, मी इतर वेळी शाळेत तर जातोच, परंतु शाळेव्यतिरिक्त मिळणारा सारा वेळ माझ्या अभ्यासातच जातो. मला खूप अभ्यास करून डेमॉक्रेटसप्रमाणे मोठा विद्वान व्हायचे आहे. त्यावर डेमॉक्रेटस त्या मुलाला म्हणाला की, तू त्या डेमॉक्रेटसला ओळखतोस का? तेंव्हा त्या मुलाने नाही, असेच उत्तर दिले. मात्र नंतर डेमॉक्रेटसने त्या मुलाच्या शिक्षणाची सर्व जबाबदारी स्वतःहून स्वीकारली. कठोर परिश्रम घेऊन केलेला अभ्यास आणि डेमॉक्रेटसचे मार्गदर्शन यामुळे हा मुलगा मोठेपणी भूमितीचा तज्ज्ञ झाला. पायथागोरस हे त्याचे नाव. भूमितीमधील ‘पायथागोरसचा सिद्धांत’ जगप्रसिद्ध आहे.
-श्रीकांत नारायण
Leave a Reply