सिद्धी प्राप्ती तपस्या देती
बुद्धी योग नीतीचा
कर्मयोग साधण्यासाठी
नाश करावा भीतीचा!!
अर्थ–
करियर करण्यासाठी शिक्षण मिळणं गरजेचं आहे. कर्म करण्यासाठी सिद्धी प्राप्त होते आवश्यक असते. मग ती सिद्धी कशी मिळणार? अभ्यास केल्या शिवाय आपण पास होतो का? मी आजच्या शिक्षण पद्धती विषयी बोलतच नाहीये. कारण आजकाल अभ्यासाशिवाय पास करणारी पद्धत आहे जी चुकीची आहे. तर अभ्यासा शिवाय ज्ञान नाही आणि ज्ञाना शिवाय गुण नाही. मग गुण येण्यासाठी त्याची सिद्धी प्राप्त होण्यासाठी तपस्या करणे गरजेचे आहे.
पण त्यासाठी लागणारी बुद्धी कुठून येणार? बुद्धी ही देवाची देणं आहे असं मला वाटतं. अतिशय बुद्धिवान लोकांच्या मधे नाठाळपण येऊ शकत तसेच अतिशय मूर्खा मधल्या चमूत ही बुद्धी वान जन्मू शकतो. श्रीमंत आणि गरीब हे माणसाने केलेले विभाग हे बुद्धीच्या आड येत नाही.
पण येथे अजून एक गोष्ट समजून घेणे महत्वाचे आहे आणि ती म्हणजे बुध्दी आणि सिद्धी जरी असली तरी ती वापरायची कुठे आणि कशी याची जर भीती वाटत असेल तर त्या दोन्ही गोष्टींचा उपयोग नाही.
माझ्या कडे व्यवसाय कौशल्य आहे, त्यासाठी लागणारा पैसा आहे पण मोठी उडी घ्यायला भीती वाटत असेल तर काय उपयोग? म्हणून बुद्धी आणि सिद्धी बरोबर स्वतःवरचा आत्मविश्वास जर बरोबर असेल तर आकाश ही ठेंगणे पडू शकते.
— सुमंत परचुरे.
Leave a Reply