(४) फास्ट फूडमधील तुपामध्ये ‘ट्रान्स फॅट्स’ नावाची फास ‘दयाला हानीकारक द्रव्ये असतात. त्यामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढून ‘दयरोगाला आमंत्रणच मिळते.
(५) मुलांना अस्थमा किंवा अॅलर्जीचा त्रास असल्यास अशा पदार्थांचा कृत्रिम रंग, फ्लेवर, प्रिझरवेटिव मुळे असे आजार बळावू शकतात.
(६) फ्रेंच फ्राइज (तळलेले बटाट्याचे चिप्स) हे तापमानाला तळले जातात. त्यामुळे त्यात हे खूप उच्च ॲक्रिलमाईड नावाचे अत्यंत घातक असे द्रव्य तयार होते. अॅक्रिलामाईड हा रासायनिक पदार्थ खूप तापमानात निरनिराळे पिष्टमय (१२० अंशापेक्षा जास्त) तळल्यास/भाजल्यास तयार होतो. स्वीडिश शास्त्रज्ञांना एप्रिल २००२ मध्ये हा पदार्थ पोटॅटो चिप्स, फ्रेंच फ्राइज व पाव खूप तापमानात तळल्यावर आढळला. उकडलेल्या पदार्थात अथवा गरम न केलेल्या पदार्थात तो आढळला नाही. हा कर्करोगजन्य पदार्थ माणसात चेतनातंतूना हानीकारक आहे. एफ. डी. ए. च्या अभ्यासानुसार पदार्थातील ॲसपॅरॅजीन ग्लुकोजच्या सान्निध्यात तापवल्यास ॲक्रिलामाईड हा पदार्थ तयार होतो.
(७) फास्ट फूडमधील साखर व तंतूविरहित पदार्थ दातांना चिकटून दात किडणे व इतर दातांच्या समस्या लहान मुलांमध्ये आढळून येतात.
(८) शीतपेयांच्या अतिरिक्त सेवनामुळे हाडांमधील कॅल्शियमचे प्रमाण घटते व हाडे कमकुवत होतात.
(९) या पदार्थांमुळे पचन संस्थेवर प्रचंड प्रमाणात ताण येतो. कृत्रिम रंग, फ्लेवर, प्रिझरवेटिवमुळे यकृत, मुत्रपिंडावर ताण पडतो. जास्त प्रमाणात घेतलेली साखर, तेल, तूप, मैदा पचविण्यासाठी शरीरातील जीवनसत्व, खनिज यांचा साठा वापरला जातो. शरीराचे नैसर्गिक संतुलन बिघडून विविध रोगांना आमंत्रण मिळते.फास्ट फूड सहज कुठेही उपलब्ध होते.
हे पदार्थ स्टेशनवर, रस्त्यावरील स्टॉलवर, दुकानात अगदी सोईस्कर पद्धतीने पॅक केलेले असतात. असे पदार्थ अतिशय आकर्षकपणे मांडले जातात. रंगीबेरंगी असल्यामुळे लहान व तरुण मुलांना अशा पदार्थांचा मोह पडतो.
अनेकदा घरी बनविलेल्या पदार्थांपेक्षा हे पदार्थ चवीलाही जास्त चांगले लागतात. परंतु तरीही वर दिलेले आरोग्यावर होणारे दुष्परिणाम पाहाता हे पदार्थ शक्यतोवर टाळलेलेच बरे !!
-गीतांजली चितळे
मराठी विज्ञान परिषद
Leave a Reply